अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता राऊत यांचे आश्वासन

चंद्रपूर – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता राऊत यांनी शिधा म्हणून व्हिस्की आणि बिअर देण्याचे आश्वासन मतदारांना दिले आहे. देशी पिणार्या गरिबांनाही चांगली दारू मिळावी, यासाठी असे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.
वर्ष २०१९ मध्ये राऊत यांनी चिमूर विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्या वेळी त्यांनी ‘गाव तिथे दारूचे दुकान’ असे आश्वासन दिले होते. चंद्रपूरकरांनी त्यांच्या या आश्वासनाला प्रतिसाद न दिल्याने त्यांचा पराभव झाला होता. (जनतेसाठी हितकारक कृती करणे दूरच; पण त्यांना व्यसनांच्या आधीन करणे कितपत योग्य ? सूज्ञ मतदार याचा विचार करतीलच ! – संपादक)
संपादकीय भूमिकाजनतेला काय द्यायला हवे, तेही न कळणारे उमेदवार ! |
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court