उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच लोकसभेची २ आवेदने भरली !

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची बंडखोरी !

बुलढाणा – शिवसेनेचे येथील आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभा निवडणुकीसाठी २ उमेदवारी आवेदने प्रविष्ट केली आहेत. आपल्या पक्षाचे उमेदवार घोषित होण्यापूर्वीच गायकवाड यांनी आवेदन प्रविष्ट केल्याने त्यांनी बंडखोरी केल्याचे म्हटले जात आहे. आवेदन प्रविष्ट करतांना त्यांच्यासमवेत शिंदे गटाचे कार्यकर्ते वगळता मित्रपक्ष असणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कोणतेही पदाधिकारी उपस्थित नव्हते.

शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली सूची २८ मार्च या दिवशी घोषित होणार आहे. त्यात खासदार प्रतापराव जाधव यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्यामुळे आमदार संजय गायकवाड यांनी तातडीने आपले आवेदन प्रविष्ट केले आहे. संजय गायकवाड यांनी बुलढाणा मतदारसंघासाठी २ उमेदवारी आवेदने भरली आहेत. यापैकी १ आवेदन त्यांनी शिवसेनेचा डमी उमेदवार म्हणून भरला असून दुसरा उमेदवार अपक्ष म्हणून भरला आहे.