पुणे – येरवडा मध्यवर्ती कारागृहात गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगणार्या न्यायाधीन बंदीवानांच्या टोळीने शेरखान पठाण या कारागृह अधिकार्याला कर्तव्य बजावत असतांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मारहाण करणारे बंदीवान कुख्यात गुन्हेगार आंदेकर टोळीचे सदस्य असल्याचे समजते. काही बंदीवानांनी कार्यालयातील आसंद्या उचलून त्या अधिकार्याला फेकून मारहाण करण्याचा प्रयत्न केला; पण बराकीतील इतर बंदीवानांनी त्यांना रोखले. बंदीवानांच्या मारहाणीत अधिकार्याच्या डोळ्याला इजा झाली असून डाव्या हाताचे मनगटाचे हाड मोडले (फ्रॅक्चर) आहे. कारागृह अधिकार्याने शिवीगाळ केल्याचा आरोप बंदीवानांनी केला आहे. या प्रकरणी विकी कांबळे, प्रकाश रेणुसे आणि इतर १० बंदीवान यांच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम चालू आहे.
प्रशासनाने तात्काळ मोठा फौजफाटा तैनात केला असून मारहाण करणार्या बंदीवानांना वेगवेगळ्या बराकीत बंद केले आहे. येरवडा पोलीस कारागृहात जाऊन मारहाणीची सविस्तर माहिती घेत आहेत.
संपादकीय भूमिकामागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीने टोक गाठले आहे. यावरून गुन्हेगारांना पोलिसांची भीतीच उरली नसल्याचे स्पष्ट होते. हे पोलिसांना लज्जास्पद ! |