रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाच्या भीतीमुळे युरोपमध्ये तणाव

रशिया आणि त्याचा शेजारी देश युक्रेन यांच्यात युद्ध होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. युक्रेनच्या सीमेवर रशियाच्या सैन्याने तिची कुमक वाढवली आहे. येथे युद्धाची स्थिती निर्माण होत असतांना फ्रान्सने त्याची युद्ध सिद्धता जोरात चालू केली आहे.

इंडोनेशियामध्ये पूर आणि भूस्खलन यांमुळे आतापर्यंत १४० हून अधिक जणांचा मृत्यू

येथे सातत्याने मुसळधार पाऊस पडत असल्याने बेपत्ता लोकांच्या शोधामध्ये अडथळे येत आहेत. अदोनारा बेटावरील पूर्व फ्लोरेस जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मनुष्यहानी झाली आहे. येथे झालेल्या भूस्खलनात अनेक लोकांचा मृत्यू झाला.

भारताचा जीडीपी १२.५ टक्के होण्याची शक्यता ! – जागतिक नाणेनिधीचा अंदाज

भारताचा विकासदर विक्रमी म्हणजे १२.५ टक्के इतका असेल, असे जागतिक नाणेनिधीने तिच्या अहवालात म्हटले आहे. वर्ष २०२२ पर्यंत जागतिक अर्थव्यवस्था ६.९ टक्क्यांनी  वृद्धींगत होईल, असेही नाणेनिधीने यात म्हटले आहे.

अमेरिकेत बंदुकांची मोठ्या प्रमाणात विक्री !

उच्चशिक्षित आणि प्रगत समाज (?) असणार्‍या अमेरिकेतील समाजजीवन किती खालावले आहे, हेच यातून दिसून येते !

२२ देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट

भारतामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असतांनाच जगभरातील २२ देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली आहे. यांमध्ये ब्राझिल, फ्रान्स, युक्रेन आणि रशिया यांसारख्या देशांचा समावेश आहे

श्रीलंकेत इस्लामिक स्टेट, अल कायदा यांसह ११ जिहादी आतंकवादी संघटनांवर बंदी

श्रीलंका सरकारने इस्लामिक स्टेट, अल कायदा यांच्यासह अन्य ९ जिहादी आतंकवादी संघटनांंवर बंदी घातली आहे. श्रीलंकेत वर्ष २०१९ मध्ये झालेल्या जिहादी आत्मघाती आक्रमणामध्ये २७० जणांचा मृत्यू झाला होता

(म्हणे) ‘पाकमधील बलात्कारांसाठी भारतीय संस्कृती उत्तरदायी !’ – पाकच्या पंतप्रधानांचे भारतद्वेषी विधान 

भारतीय संस्कृतीचे आचरण पाकच्या नागरिकांनी केले असते, तर तेथे बलात्कार झाले नसते आणि जिहादी आतंकवादीही निर्माण झाले नसते ! 

येत्या ४ आठवड्यांत जागतिक महायुद्धाला प्रारंभ होईल ! – रशियातील संरक्षणतज्ञाचा दावा

येत्या ४ आठवड्यांत म्हणजे मासाभरात जागतिक युद्धाला प्रारंभ होऊ शकतो, असा दावा रशियाचे संरक्षणतज्ञ पावेल फेलगेनहॉर यांनी केला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचे महायुद्धात रूपांतर होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

अफगाणिस्तानमध्ये वायूदलाच्या आक्रमणात ८० तालिबानी ठार

अफगाणिस्तानच्या अरघनदाब जिल्ह्यात वायूदलाने केलेल्या हवाई आक्रमणामध्ये ८० आतंकवादी ठार झाले. यात तालिबानी संघटनेचा प्रमुख सरहदी हाही ठार झाल्याची माहिती अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते फवाद अमान यांनी दिली.

पाकमध्ये आतंकवाद्यांकडून न्यायमूर्तींसह तिघांची हत्या

पाकच्या आतंकवादविरोधी न्यायालयाचे न्यायमूर्ती आफताब आफ्रिदी हे त्यांच्या कुटुंबियांसमवेत पेशावर-इस्लामाबाद या मार्गावरून जात असतांना आतंकवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.