म्‍हैसाळ (जिल्‍हा सांगली) येथेही हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन !

आंदोलनात झालेल्‍या मागण्‍यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ३१ जानेवारीला सांगली येथे निवासी उपजिल्‍हाधिकारी मौसमी बर्डे यांना देण्‍यात आले.

‘श्रीरामचरितमानस’चा अवमान करणारे बिहारचे मंत्री चंद्रशेखर आणि उत्तरप्रदेशचे समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांना तात्काळ अटक करा !

दोन्ही नेत्यांवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तात्काळ गुन्हे नोंदवून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’त करण्यात आली.

तीर्थक्षेत्रांना पर्यटनाचा दर्जा देण्‍यात आल्‍यास असंतोष निर्माण होईल ! – केतन शहा

‘सम्‍मेद यात्रा पूर्ण केल्‍याविना आमचे जीवन अपूर्ण आहे’, असे आम्‍ही मानतो. सरकारने केवळ ‘सम्‍मेद शिखरजी’च नव्‍हे, तर हिंदूंच्‍या सर्वच पवित्र स्‍थळांना ‘तीर्थक्षेत्र’ म्‍हणून घोषित करायला हवे. हिंदु आणि जैन समाज हे भिन्‍न नाहीत.

‘लव्‍ह जिहाद’ हा देशासमोरील मोठा धोका !- रोहित पाटील, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान

‘लव्‍ह जिहाद’ हा देशासमोरील मोठा धोका आहे. त्‍यासाठी पाल्‍यांनी त्‍यांच्‍या मुलीला संस्‍कार देऊन त्‍यांचे या जाळ्‍यापासून रक्षण करावे, तसेच प्रत्‍येकाने धर्मशिक्षणही घेणे आवश्‍यक आहे. सर्व हिंदूंनी एकत्र येऊन देशभक्‍ती आणि राष्‍ट्रभक्‍ती जोपासली पाहिजे, असे आवाहन ‘श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान’चे धारकरी श्री. रोहित पाटील यांनी केले.

‘सम्‍मेद शिखरजी’ला तीर्थक्षेत्र घोषित करा ! – हिंदु जनजागृती समिती

धार्मिक स्‍थळ ‘सम्‍मेद शिखरजी’ला तीर्थक्षेत्राच्‍या रूपात घोषित करण्‍याविषयीची जैन समुदायाची मागणी त्‍वरित स्‍वीकारावी, अशी मागणी देहलीतील जंतरमंतर येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलना’त करण्‍यात आली. या आंदोलनामध्‍ये अनेक हिंदुत्‍वनिष्‍ठ सहभागी झाले होते.

जैन पंथियांचे श्रद्धास्थान सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करा ! – उमेश गांधी, हिंदु महासभा

सरकारच्या या निर्णयामुळे अहिंसावादी जैन पंथियांना संपूर्ण भारतामध्ये मोर्चे काढून निषेध आंदोलने करावी लागली. त्यामुळे केवळ जैन पंथियांच्याच नव्हे, तर कोणत्याही धार्मिक स्थळांचे महत्त्व जाणून घेऊन सरकारने निर्णय घेणे आवश्यक आहे.

पाकिस्‍तान येथे सातत्‍याने होणार्‍या हिंदूंच्‍या हत्‍यांविषयी भारताने आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर आवाज उठवावा !

झारखंड राज्‍यातील सम्‍मेद शिखर या जैन समाजाच्‍या दृष्‍टीने अत्‍यंत पवित्र असलेल्‍या धर्मस्‍थळाला तीर्थक्षेत्र घोषित करावे आणि पाकिस्‍तान येथे सातत्‍याने होणार्‍या हिंदूंच्‍या हत्‍यांविषयी भारताने आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर आवाज उठवावा, या मागणीसाठी ८ जानेवारी या दिवशी स्‍थानिक दत्त चौक येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन घेण्‍यात आले.

‘सोनी लिव’ने सत्य घटना मांडून भाग पुनर्प्रसारित करावा !

‘सोनी लिव’संकेतस्थळाने प्रसारित केलेला भाग आफताबच्या प्रकरणाचा नव्हता, तर त्याने (‘सोनी लिव’ने) त्यांच्या ‘ॲप’वरील २१२ क्रमांकाचा भाग काढून (डिलीट) का टाकला ? हा पुरावे नष्ट करण्याचाच प्रकार आहे. ‘सोनी लिव’ने व्यक्त केलेला खेद, हा हिंदु समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार आहे.

हिंदुविरोधी ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट १९९१’ (प्रार्थनास्थळे कायदा) कायदा त्वरित रहित करा !

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’मध्ये हिंदुत्वनिष्ठांची संतप्त मागणी

संपूर्ण देशासाठी लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा करा ! – कार्तिक साळुंके, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देहली येथील जंतरमंतरवर हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन