भारताची प्रतिमा मलीन करणार्‍या ‘बीबीसी’वर कारवाई करावी ! – हिंदु जनजागृती समिती

  • वर्धा येथे विविध मागण्‍यांसाठी हिंदु जनजागृती समितीचे हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन

  • भारतात ‘ईशनिंदाविरोधी कायदा’ करण्‍यात यावा !

  • पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरातील दान पेटीत खोटे दागिने मिळाल्‍याची सखोल चौकशी करावी !

वर्धा येथे विविध मागण्‍यांसाठी हिंदु जनजागृती समितीचे हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन

वर्धा, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – गुजरात दंगलीविषयी खोटी माहिती प्रसारित करून भारताची प्रतिमा मलीन करणारे ‘बीबीसी न्‍यूज’ आणि अन्‍य दोषींवरही कारवाई करण्‍यात यावी, पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात बनावट दागिनेे दानात मिळाल्‍याचे आढळून आले आहेत. तेव्‍हा खरे दागिने लंपास करून त्‍या ठिकाणी खोटे दागिने ठेवण्‍यात आले का ? याची सखोल चौकशी करावी. उत्तरप्रदेशमधील समाजवादी पक्षाचे नेते स्‍वामी प्रसाद मौर्या यांनी ‘रामचरितमानस’मधील चौपाईवर बंदी घालून ते ग्रंथ कह्यात घेण्‍याची मागणी केली असून तेथे ‘रामचरितमानस’च्‍या प्रतीही जाळण्‍यात आल्‍या, तसेच कर्नाटकमधील प्रा. के.एस्. भगवान यांनी, ‘‘प्रभु श्रीराम हे सीतेसमवेत दिवसभर मद्यपान करत होते. त्‍याने ११ सहस्र नाही, तर केवळ ११ वर्षे राज्‍य केले’’, अशी अतिशय खालच्‍या पातळीवर टीका केली. अशा प्रकारे सातत्‍याने होणारा हिंदु देवदेवतांचा अवमान थांबवण्‍यासाठी त्‍वरित ईशनिंदा कायदा करण्‍यात यावा, या मागण्‍यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने २७ फेब्रुवारी या दिवशी स्‍थानिक छत्रपती शिवाजी चौकात ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन’ करण्‍यात आले. आंदोलनानंतर निवासी उपजिल्‍हाधिकारी अर्चना मोरे यांना मागण्‍यांचे निवेदन सादर करण्‍यात आले.

या आंदोलनामध्‍ये सर्वश्री श्रीराम मंदिराचे संजीव लाभे, संजीव हरदास, हिंदु जनजागृती समितीचे शशिकांत पाध्‍ये, विजय निमकर, जगदीश इंगोले, सौ. शिल्‍पा पाध्‍ये, सौ. भक्‍ती चौधरी, सौ. भार्गवी क्षीरसागर, सौ. तुलसी सब्राह, तसेच अनेक धर्माभिमानी उपस्‍थित होते.