आजारांवरील योगाभ्यास
योग ही शरीर, मन आणि आत्मा यांची एकात्मता आहे. योग म्हणजे केवळ आसने नव्हे, तर जीवनशैली आहे. श्वासावर नियंत्रण ठेवणे म्हणजे मनावर नियंत्रण ठेवणे.
योग ही शरीर, मन आणि आत्मा यांची एकात्मता आहे. योग म्हणजे केवळ आसने नव्हे, तर जीवनशैली आहे. श्वासावर नियंत्रण ठेवणे म्हणजे मनावर नियंत्रण ठेवणे.
महर्षी वसिष्ठ मुनींनी या साधनेस ‘मोक्षमंदिराचा द्वारपाल’ म्हटले आहे. शम, विवेक, संतोष आणि संतसहवास या चार गुणांचा योग्याच्या आचरणात अंतर्भाव असतो. यात संतसहवास हा महत्त्वाचा गुण आहे. उपासना, साधना ही सदैव चालू असली पाहिजे.
नियमित योगाभ्यासामुळे चेतासंस्थेतील पेशींवर योग्य प्रमाणात ताण आल्यामुळे धमन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल आणि अन्य पदार्थ साठण्याचे प्रमाण अल्प होते किंवा होत नाही किंवा ‘बॅड कोलेस्ट्रॉल’चे रूपांतर ‘गुड कोलेस्ट्रॉल’मध्ये होते.
योग: चित्तवृत्ती निरोध: । अर्थ : योग म्हणजे चित्ताच्या वृत्तींचा निरोध करणे (मन शांत करणे)
बेकरीचे आणि आंबवलेले सर्वच पदार्थ पचण्यास जड असतात. मैदा, तसेच तांदळाच्या पिठापासून बनवलेले पदार्थ आतड्यांना कमकुवत (दुर्बल) करतात. पोहेसुद्धा आंबवलेल्या पदार्थांप्रमाणेच शरिरावर परिणाम करतात.
ताडासन : शरिराचे स्नायू वर खेचले जातात. ताण बसल्याने त्यात साठलेला मेद अल्प होऊ लागतो.
अर्धमत्स्येंद्रासन : पचनसंस्था कार्यरत झाल्यामुळे तिची क्षमता पुष्कळ वाढते. चरबी वितळायला साहाय्य होते. शरिराच्या कडेची चरबी खर्च होते.
प्राणायाम नियमितपणे केल्यास सर्व रोग नष्ट होतात. चुकीच्या पद्धतीने, अयोग्य वेळेस केला, तर आजार होऊ शकतात.
योगाभ्यास करतांना शक्यतो डोळे बंद करावेत आणि प्रत्येक क्षणी – ‘कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने । प्रणतः क्लेष नाशाय गोविंदाय नमो नमः ।’ हा मंत्र मनात अखंडपणे म्हणत रहावा.
‘व्हर्टिगो’ : मान किंवा कान यांतील समस्येमुळे चक्कर येणे
‘आधुनिक तंत्रज्ञानाने आपले जीवन सुलभ केले असले, तरी त्यामुळे शरिराची हालचाल न्यून झाली आहे. दिवसभर बसून काम केल्यामुळे निर्माण होणारी ‘बैठी जीवनशैली’ आरोग्याच्या संदर्भात अनेक समस्या निर्माण करते….