बनासकांठा (गुजरात) – येथील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिराच्या दान पेटीतील नोटा मोजणीच्या वेळी कर्मचार्याकडून नोटांची चोरी करण्यात येत असल्याचे ‘सीसीटीव्ही’चे चित्रीकरण आता समोर आले आहे. हे चित्रीकरण २ महिन्यांपूर्वीचे आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी चिराग ठाकूर यांच्यासह ३ कर्मचार्यांना त्या वेळी अटक केली होती. हे कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर येथे कामाला होते. मंदिर न्यासाने हे कंत्राट रहित केले होते.
Shocking news from Gujarat’s famous Ambaji Temple Shakti Peetha, where a theft during currency counting from 2 months ago has just come to light! 🚨
Everyone working or serving in a temple must be a true devotee and seeker. Temple sanctity cannot be compromised!#AmbajiTemple… pic.twitter.com/TA7vhW8DkY
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 15, 2026
हे कर्मचारी नोटा मोजतांना नोटांचे बंडल पायाखाली लपवतांना या चित्रीकरणात दिसून आले होते. पैशांचे बंडल लपवल्यानंतर चिराग ठाकूर प्रसाधनगृहात जाण्याच्या बहाण्याने बाहेर पडत होता. त्याचवेळी त्याच्या खिशातून १ लाख ४ सहस्र रुपयांचे एक बंडल खाली पडले. तेथे उपस्थित असलेल्या इतर कर्मचार्यांनी त्याला पहाताच तात्काळ वरिष्ठ अधिकार्यांना याची माहिती दिली होती. यानंतर मंदिर न्यासाने त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती.

हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
भोंदू बाबा फिरोज शेख याला २ दिवसांची पोलीस कोठडी !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !