(या लेखातील लिखाण सौ. वैदेही कुलकर्णी, योगशिक्षिका, मेडिकल योग थेरपिस्ट, न्युरोथेरपिस्ट, पुणे यांचे आहे.)
‘व्हर्टिगो’
(मान किंवा कान यांतील समस्येमुळे चक्कर येणे)

लक्षणे
चक्कर येणे किंवा आजूबाजूचे फिरत असल्याप्रमाणे वाटणे, मळमळ, उलट्या, ऐकण्याची क्षमता अल्प होणे, डोकेदुखी, कानात संवेदना जाणवणे
उपाय
१. अनुलोम-विलोम क्रिया (५० वेळा)
२. भस्रिका (५० वेळा)
३. भ्रामरी क्रिया (१५ वेळा)
४. जालंधर बंध (५ सेकंद १५ वेळा)
५. मूलबंध (५ सेकंद १० वेळा)
६. नीरालंबासन
७. पुढे चालणे आणि मागे चालत येणे (‘एल्बो वॉकिंग’) (१० वेळा)
८. मानेचे व्यायाम सावकाश करणे
९. बसून पाय पसरून पायाचे सूक्ष्म व्यायाम
१०. विपरित करणी (खाली झोपून खुर्चीवर दोन पाय वर ठेवणे. डोळ्यांवरती पलंगपोसाची घडी ठेवून शांत पडून रहाणे) (२० मिनिटे)
११. सूर्यनमस्कार (संख्या १८)
१२. ताडासन, वृक्षासन, उत्कट आसन, मृदंगासन, नटराज आसन (२ मिनिटे)
१३. उष्ट्रासन (१० वेळा)
१४. अर्धमत्स्येंद्रासन (दोन्ही बाजूला प्रत्येकी ३ मिनिटे)
१५. सेतुबंधासन (१० वेळा)
१६. उज्जयी प्राणायाम (१५ ते २० वेळा)
१७. भ्रामरी प्राणायाम (५ वेळा)
१८. ॐकार (५ वेळा)
लठ्ठपणा
(चरबी वाढणे)

कारणे
उच्च ‘कोलेस्ट्रॉल’ (पेशींच्या कार्यासाठी आवश्यक मेदजन्य पदार्थ), उच्च रक्तदाब, रक्तातील साखरेची पातळी अधिक असणे, वजन अधिक असणे, पोटात अधिक चरबी जमा होणे, अधिक मद्यपान, कधी कधी विषाणूंमुळे
उपाय
१. सकाळी एक पेला कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळावे आणि अर्धा चमचा हळद टाकून ते पाणी प्यावे.
२. संध्याकाळी ६.३० वाजता जेवण केले, तर दुसर्या दिवशी १०.३० वाजता जेवण करावे. मध्ये काही खाऊ नये.
३. सूर्यनमस्कार (संख्या १८)
४. अर्धमत्स्येंद्रासन (दोन्ही बाजूने ३ मिनिटे)
५. भुजंगासन (१० वेळा)
६. शलभासन (१० वेळा)
७. भुजंगासन आणि शशांक आसन जोडून (१० वेळा)
८. उष्ट्रासन (१० वेळा)
९. धनुरासन (१० वेळा)
१०. कपालभाती (१२० वेळा)
११. सायकल चालवणे
१२. पोहणे
१३. प्रतिदिन ५ कि.मी. चालणे
निद्रानाश

लक्षणे
यात झोप लागणे कठीण होऊन जाते किंवा मध्येच जाग येते आणि झोप लागत नाही. झोपेतून जागे झाल्यावर थकवा जाणवू शकतो.
कारणे
झोपेचे अनियमित वेळापत्रक, अयोग्य किंवा वाईट सवयी, मानसिक विकार, चिंता किंवा भीती, मेंदूशी संबंधित समस्या, अधिक वेळ संगणक किंवा भ्रमणभाष हाताळणे (‘स्क्रिन टाईम’ वाढणे), चहाचे अतीसेवन, दिवसभर मेंदूला ताण दिल्यामुळे आणि त्याच्याकडून काम करून घेतल्यामुळे ‘सिंफेथेटिक नर्व्हस सिस्टीम’ (शरिरात ताण, ऊर्जा, उष्णता, घाम, हृदयाचे ठोके, रक्तदाब वाढवणारी यंत्रणा) कार्यरत रहाणे
परिणाम
निद्रानाशामुळे शरिरातील ऊर्जेची पातळी न्यून होते. आरोग्य बिघडते. कार्यक्षमता अल्प होते. व्यक्तीमत्त्वावर त्याचा परिणाम होतो.
प्राणायामामुळे ‘पॅरासिंफेथेटिक नर्व्हस सिस्टिम’ (शरिरात विश्रांतीच्या वेळी श्वास, हृदयाचा ठोका मंद करणे, पचनक्रिया वाढवणे आदी करणारी यंत्रणा) कार्यरत होते.
उपाय
१. झोपण्यापूर्वी भ्रमणभाष पाहू नये.
२. खोलीमध्ये निरांजन लावून ठेवावे.
३. अनुलोम-विलोम प्राणायाम (१० वेळा)
४. शीतली प्राणायाम (५ वेळा)
५. शीतकारी प्राणायाम (५ वेळा)
६. भ्रामरी प्राणायाम (५ वेळा)
७. ‘ॐ’कार उच्चारण (५ वेळा)
८. भिंतीजवळ झोपावे. कंबर भिंतीला लावावी आणि दोन्ही पाय २० मिनिटे वरती करावेत. कमरेखाली उशी घेऊ शकतो आणि डोळ्यांवर जाड बेडशीटची घडी ठेवल्यावर मेंदू शांत होतो.
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !