ग्राहक मंचाकडून डाबर आस्थापनाला ७० सहस्र रुपयांचा दंड
सिमला (हिमाचल प्रदेश) – हिमाचल प्रदेशाच्या ग्राहक मंचाने ‘डाबर इंडिया लिमिटेड’ या आस्थापनाला ग्राहकाला तिच्या पॅकेट बंद फळांच्या रसामध्ये (ज्यूसमध्ये) काळी बुरशी आढळल्याने आणि त्यामुळे उपवास मोडल्याने पीडित ग्राहकाला ७० सहस्र रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश दिला.

काय आहे प्रकरण ?
२६ जुलै २०२४ या दिवशी ग्राहकाने श्रावण मासातील उपवासाच्या वेळी डाबर आस्थापनाचा ‘रियल फ्रूट पॉवर मोसंबी’ हे १ लीटरचे ज्यूस खरेदी केल होत. ज्यूस पित असतांना त्यांना चव काहीशी वेगळी आणि संशयास्पद वाटली. त्यांनी त्या जुसचे ‘पॅक’ कापून आत पाहिले असता, त्यात मोठ्या प्रमाणावर काळी बुरशी तरंगतांना दिसली. यानंतर त्याने ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवली. ग्राहक मंचाच्या देखरेखीखाली ज्यूसचे नमुने सरकारी प्रयोगशाळेत पडताळणीसाठी पाठवण्यात आले. या पडताळणीत ज्यूसमध्ये मानवी आरोग्याला घातक असणारी बुरशी असल्याचे सिद्ध झाले.
डाबर आस्थापनाने मात्र स्वतःची बाजू मांडतांना सांगितले की, त्यांच्या उत्पादनात कोणतीही त्रुटी नव्हती. एकाच बॅचमधील १ लाख ८ सहस्रांहून अधिक पॅकेट्स विकले गेले असून कुठेही अशी तक्रार आलेली नाही.
यावर ग्राहक मंचाने ‘पीडित ग्राहकाला मानसिक त्रास झाल्यासाठी ६० सहस्र रुपये आणि कायदेशीर खर्चासाठी १० सहस्र रुपये ४५ दिवसांच्या आत द्यावेत. तसेच निष्काळजीपणाबद्दल ग्राहक कल्याण निधीत ३० सहस्र रुपये जमा करावेत’, असा आदेश डाबर आस्थापनाला दिला.
संपादकीय : ‘रिचार्ज’चा फसवा खेळ !
शेष राहिलेला मोबाईल डेटा दुसर्या दिवशी वापरता न येणे, हा ग्राहकांवर अन्याय ! – AAP MP Raghav Chadha
भोजनावर सेवाशुल्क आकारणार्या मुंबईतील रेस्टॉरंटला ५० सहस्र रुपयांचा दंड !
ग्राहकांचे पार्सल हडप करून आर्थिक अपहार करणार्या ११ पार्सल विक्रेत्यांविरोधात कारवाई !
ग्राहकांना तक्रार करण्यापासून ते न्याय मिळेपर्यंत केवळ संघर्षच करावा लागतो ! – विलास लेले, ग्राहक पंचायत
राज्यात १० ‘उमेद मॉल’ उभारण्यासाठी २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध ! – जयकुमार गोरे, ग्रामविकासमंत्री