
आहाराचे प्रमाण अधिक असले आणि त्याचे योग्य प्रमाणात पचन झाले नाही, तर आपल्या शरिरातील धमन्यांमध्ये चरबी, कोलेस्ट्रॉल आणि इतर पदार्थांचे साठे (प्लेक) जमा होऊन धमन्या अरूंद होतात. धमन्यांवर याचे थरच्या थरही (डिपॉझिट) साठू शकतात. यालाच धमनीकाठीण्य किंवा एथेरोस्क्लेरोसिस (Atherosclerosis) म्हणतात. त्यामुळे अवयवाला रक्तपुरवठा न्यून होऊन रक्तातील प्राणवायू, ग्लुकोज आदी पदार्थ अल्प प्रमाणात मिळाल्यामुळे अवयवांच्या हालचालींवर त्याचा परिणाम होतो. मसल्स (मांसपेशी) दुखणे, छातीत दुखणे, पाय, कंबर दुखणे आदी तक्रारी वाढतात. काही काळाने अवयवांचे कार्य अधिक न्यून होते, तेव्हा हृदयविकाराचा झटकाही येतो. नियमित योगाभ्यासामुळे चेतासंस्थेतील पेशींवर योग्य प्रमाणात ताण आल्यामुळे शेजारी म्हटल्याप्रमाणे धमन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल आणि अन्य पदार्थ साठण्याचे प्रमाण अल्प होते किंवा होत नाही किंवा ‘बॅड कोलेस्ट्रॉल’चे रूपांतर ‘गुड कोलेस्ट्रॉल’मध्ये होते. त्याला योग्य आहार-विहाराची जोड दिल्यास वरील कारणांमुळे उद्भवलेला उच्च रक्तदाब, मधुमेह आदी अन्य रोगांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.
– सौ. वैदेही कुलकर्णी, योगशिक्षिका, मेडिकल योग थेरपिस्ट, न्युरोथेरपिस्ट, पुणे
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
आहारात साखर, तेल अल्प करा आणि व्यायामावर भर द्या ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
World Yogasana Championship : आजपासून कर्णावती (गुजरात)मध्ये पहिली विश्व योगासन स्पर्धा !
अन्न-औषध विभागाकडून राज्यभरात गुटखामाफियांवर धाडी !
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !