गुन्हेगारी टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे आध्यात्मिक साधना शिकवणे !

‘भ्रष्टाचार, बलात्कार, गुंडगिरी, हत्या, राष्ट्रद्रोह, धर्मद्रोह इत्यादी गुन्हे होऊ नयेत म्हणून शाळेत, महाविद्यालयात आणि समाजात स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या गेल्या ७७ वर्षांत एका तरी सरकारने शिक्षण दिले का ? न दिल्यामुळे कोट्यवधी गुन्हे झाले आहेत आणि होतही आहेत.

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्या आजारपणात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अनुभवलेली अपार कृपा !

‘प.पू. डॉक्टरांनी पू. दातेआजींना हाक मारल्यावर ‘पू. आजींच्या डोळ्यांची हालचाल होत आहे, तसेच पापण्या वर-खाली होत आहेत’, असे मला जाणवले. ‘प.पू. डॉक्टरांचे बोलणे पू. आजी ऐकत आहेत’, असा भाव पू. आजींच्या डोळ्यांत दिसत होता…

संगीतातून साधनेचा प्रवास !

‘नामसाधनेत ‘वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा’ अशा चार वाणी आहेत, त्याप्रमाणेच संगीतातही टप्पे आहेत. ‘संगीतातून साधना’ हा ईश्वरप्राप्ती होण्याचा सुलभ मार्ग आहे. साधनेच्या प्रवासातील एक टप्पा ‘अनेकातून एकात’ आणि ‘एकातून शून्यात (अनंतात)’ जाणे ’, असा आहे…

पंचज्ञानेंद्रियांनी स्थुलातील भावस्थिती अनुभवण्यापेक्षा भावातीत होणे अधिक महत्त्वाचे आणि पुढच्या टप्प्याचे आहे !

‘एकदा एका साधकाने मला सांगितले, ‘‘पूर्वी भावजागृतीचे प्रयत्न करतांना मला माझ्या डोळ्यांसमोर गुरुचरण दिसायचे; पण आता मला गुरुचरण दिसत नाहीत.

मृत्यूनंतर स्वर्गलोकी किंवा मोक्षाला जायचा विचार न करता ईश्वरी कार्यासाठी पुन्हा पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी तयार व्हा !

‘मृत्यूनंतर मला स्वर्गलोकी किंवा मोक्षाला जायचे आहे’, असा विचार अनेकांचा असतो. त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, ईश्वर त्याच्या कार्यासाठी पृथ्वीवर पुनःपुन्हा जन्म घेतो. आपणही त्यासाठी तयार असले पाहिजे.’

हिंदु धर्मज्ञानाचे अद्वितीयत्व !

‘पाश्चात्त्य विज्ञान केवळ तत्कालीन सुख मिळण्याची दिशा दाखवते, तर हिंदु धर्मातील ज्ञान चिरंतन आनंद मिळवण्याची दिशा दाखवते.’ 

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्या आजारपणात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अनुभवलेली अपार कृपा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (प.पू. डॉक्टर) पू. दातेआजी यांच्याबद्दल म्हणाले, ‘‘पू. दातेआजी यांच्या चेहर्‍याकडे पाहून चांगले वाटते. त्यांचे मनही आनंदी आहे.’’…

सूक्ष्मातील प्रयोग करतांना डोळ्यांपेक्षा तळहातांनी स्पंदने अनुभवा !

‘सूक्ष्मातील प्रयोग करतांना एखाद्या वस्तूकडे बघून डोळ्यांनी तिच्यातील स्पंदने अनुभवता येतात. या पद्धतीपेक्षा त्या वस्तूकडे तळहात करून तिच्याकडून येणारी स्पंदने तळहातावर अधिक जास्त प्रमाणात अनुभवता येतात.’

साधकांनो, नामजपादी उपायांच्या संदर्भात हे लक्षात घ्या !

नामजपादी उपायांच्या वेळी न झोपता प्रयत्नपूर्वक नामजप करा. भजने ऐकत नामजप करण्यापेक्षा नुसता नामजप एकाग्रतेने करण्याचा प्रयत्न करा !

स्त्रियांनी अंतर्मुख होणे आवश्यक !

‘कुठे पतीबरोबर थोडा वाद झाला की, घटस्फोट घेणार्‍या हल्लीच्या पत्नी, तर कुठे पतीच्या निधनानंतर त्याच्याशी एकरूप झाल्याने जोहार करणार्‍या, म्हणजे देह अग्निसमर्पण करणार्‍या पद्मावती राणी आणि तिच्या सोबतच्या १६ सहस्र राजपूत स्त्रिया !’