मन आणि बुद्धी यांचा लय करणारी उन्मनी अवस्था !
‘उन्मनी अवस्था-सर्वच गगनाकार, निराकार म्हणजे ब्रह्माकार’, अशी अनुभूती आली, म्हणजे ती संबोधी मन आणि बुद्धी यांना ग्रहण करता येत नाही; म्हणून त्याला ‘अलक्ष्य’ म्हणतात.
‘उन्मनी अवस्था-सर्वच गगनाकार, निराकार म्हणजे ब्रह्माकार’, अशी अनुभूती आली, म्हणजे ती संबोधी मन आणि बुद्धी यांना ग्रहण करता येत नाही; म्हणून त्याला ‘अलक्ष्य’ म्हणतात.
‘धर्म’ हा विज्ञान किंवा आजचे आधुनिक शास्त्र यांचा वैरी नाही. शास्त्र ज्या समस्या निर्माण करते, जे जंजाळ निर्मिते, त्याची पूर्तता ‘धर्म’ करतो. ‘धर्म’ हा विज्ञान किंवा आधुनिक शास्त्रांचा पूरक आहे. ‘धर्म’ विज्ञानाच्या टप्प्यापलीकडील गोष्टींचे विवेचन करतो; म्हणून विज्ञानाने धर्मसिद्धांतांना साहाय्य केले पाहिजे.
‘गुरुदेव’ म्हणजे आधुनिक भाषा अवगत असलेले प्राचीन ऋषीच ! शांत अशा तुर्यावस्थेत गेल्यावरही केवळ विश्वकरुणेने प्रेरित होऊन त्यांनी लेखणी हाती घेतली. गुरुदेवांच्या वाणीचा आणि लेखणीचा ..
श्रीराम प्रभु ! घनीभूत आनंद व ज्ञान हेच ज्याचे स्वरूप आहे, देश-काल-वस्तू ज्याला मर्यादा घालू शकत नाहीत.
केवळ जे घडले त्या घटना आणि प्रसंग यांचे वर्णन म्हणजे इतिहास का ? उच्चतम मूल्यांकरता सर्वस्वाचा होम करायला शिकवणार्या पूर्व घटनांचे जे विशदीकरण आहे तोच इतिहास ! इतिहास माणसाला भोगविन्मुख बनवून पुरुषार्थी, निरहंकारी आणि तेजस्वी बनवतो.
इतिहास आता स्फूर्ती, प्रेरणा, चेतना द्यायला समर्थ नाही. तो केवळ एक संदर्भ उरला आहे. अमाप खप (विक्री) हेच श्रेष्ठतेचे अंतिम प्रमाण आहे. आजचा बाजार उपभोक्त्यांचा आहे. तेथेच गुणवत्ता आहे. आजचे धनाढ्य भ्रष्ट नेते आणि समाजही विकत घेऊ शकतात.
‘संस्कृती’ (कल्चर) आणि ‘सामाजिक सुधारणा’ (सिव्हिलायझेशन) या दोन शब्दांच्या अर्थामध्ये पाश्चिमात्य लेखक जो भेद करतात, तो ध्यानी घेता भारतीय श्रद्धा ही संस्कृती प्रधान वाटते.
‘गुरुदेव, आपण आपले सत्त्व, रज आणि तम हे तिन्ही गुण भगवंताकडे लावण्याकरता प्रतिदिनचा नेम लावून घेतला आहे. आपली प्रत्येक क्रिया भगवत्प्राप्तीकरता घडेल, अशी ठेवली. या तिन्ही गुणांचे, म्हणजेच स्वतःतील ३ गुणांचे उदात्तीकरण होते.
मृत्यूनंतर जी आपल्या समवेत येईल तीच संपत्ती ! बाकी सगळी विपत्ती. बाकी सगळे दैन्य. मृत्यू धन हिरावून घेतो, सत्ता छिनून घेतो, प्रतिष्ठा हिरावून घेतो. सगळे येथेच रहाते.
आत्मज्ञानाचा, आत्मसाक्षात्काराचा महिमा अद्भुत आहे. संपूर्ण पृथ्वी धनसंपत्तीने भरूनही, सगळी वसुंधरा ही जरी आत्मज्ञान देणार्याला दिली, तरी त्याचे मोल होणार नाही.