गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी म्हणजे आधुनिक भाषा अवगत असलेले प्राचीन ऋषीच !

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘गुरुदेव’ म्हणजे आधुनिक भाषा अवगत असलेले प्राचीन ऋषीच ! शांत अशा तुर्यावस्थेत गेल्यावरही केवळ विश्वकरुणेने प्रेरित होऊन त्यांनी लेखणी हाती घेतली. गुरुदेवांच्या वाणीचा आणि लेखणीचा संपर्क होताच सत्य, शिव, सुंदर या त्रिपुटीवर आढळ विश्वास असतो. जीवनाचे स्थूल जसे लक्षात येते, तसेच सूक्ष्मही ते नजरेच्या टप्प्यात आणून सोडतात. नेत्र आंतरिक सत्याचा शोध घ्यायला प्रवृत्त होतात. गुरुदेवांच्या कृपेची नाव आम्हाला ‘शोक आणि मोह’ सागराच्या पैलतीराला न्यायला समर्थ आहे. ज्यांच्या वाणीस्त्रावातून सूर्याचा किरण पडताच पातकरूपी अंधार अस्ताला जातो, त्या गुरुचरणी शतशः प्रणाम !

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, डिसेंबर २०२३)