भारतियांच्या दृष्टीने ‘संस्कृती’ आणि ‘सामाजिक सुधारणा’ यांतील भेद !

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘संस्कृती’ (कल्चर) आणि ‘सामाजिक सुधारणा’ (सिव्हिलायझेशन) या दोन शब्दांच्या अर्थामध्ये पाश्चिमात्य लेखक जो भेद करतात, तो ध्यानी घेता भारतीय श्रद्धा ही संस्कृती प्रधान वाटते.

संस्कृती म्हणजे विचार, विवेक ! विकारांनी स्वतः बनते ती सामाजिक सुधारणा, म्हणजे मनुष्य जी साधनसंपत्ती वापरतो ती. सामाजिक सुधारणा काहीही प्रयत्न न करता पिढ्यान् पिढ्या संक्रांत होऊ शकते. संस्कृती प्रत्येक व्यक्तीने प्राप्त करून घ्यायची असते. उपयोग करणारी व्यक्ती ही उपयोगात आणणार्‍या साधनांपेक्षा श्रेष्ठ; म्हणून तर व्यक्तीगुण वाढले पाहिजेत. त्यामानाने साधनसामुग्री वाढली नाही, तरी हरकत नाही.’

– प.पू. गुरुदेव काटेस्वामीजी

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, एप्रिल २०२२)