कर्नाटकातील हिंदूंना हे मान्य आहे का ?
‘अल्लाच्या कृपेने कर्नाटकात काँग्रेस सरकार आले आहे. तुमच्या (मुसलमानांच्या) आशीर्वादाने मी गृहमंत्री झालो आहे’, असे विधान कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी बकरी ईदच्या दिवशी केले.
‘अल्लाच्या कृपेने कर्नाटकात काँग्रेस सरकार आले आहे. तुमच्या (मुसलमानांच्या) आशीर्वादाने मी गृहमंत्री झालो आहे’, असे विधान कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी बकरी ईदच्या दिवशी केले.
सौदी अरेबियाने पाकच्या सरकारी विमान वाहतूक आस्थापनाला अनुमाने ३९४ कोटी रुपये उधारी चुकवण्यास सांगितले आहे. जर पाकने ही रक्कम दिली नाही, तर पाकच्या ५० सहस्र नागरिकांना हज यात्रा करता येणार नाही.
थिरूवनंतपूरम् (केरळ) येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील एम्.बी.बी.एस्.च्या ७ मुसलमान विद्यार्थिनींनी शस्त्रक्रिया विभागात (‘ऑपरेशन थिएटर’मध्ये) हिजाब घालून जाण्याची मागितलेली अनुमती नाकारण्यात आली.
‘समान नागरी कायदा प्रथम हिंदु धर्माला लागू केला पाहिजे’, अशी मागणी द्रविड मुन्नेत्र कळघम् पक्षाचे नेते टी.के.एस्. एलंगोवन यांनी केली. पंतप्रधान मोदी यांनी समान नागरी कायद्याचे समर्थन केल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
इटली सरकारने मशिदींच्या बाहेर सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करण्यावर बंदी घालण्याचा कायदा करण्यासाठी एक प्रारूप बनवले आहे. सरकारने धर्मांतराच्या विरोधात कायदा करण्यासाठीही त्याचे प्रारूप बनवले आहे.
‘कायदा हातात घेणार्या गोरक्षकांना लाथ मारून कारागृहात टाका’, असा आदेश काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र तथा कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांना दिला.
अबुधाबी (संयुक्त अरब अमिरात) येथील महामार्गांवर वाहने थांबवून नमाजपठण किंवा अन्य कृती करणार्यांकडून १ सहस्र दिरहाम (२२ सहस्र ३१४ रुपये) दंड आकारण्यात येणार असल्याचा आदेश पोलिसांनी दिला आहे.
चंबा (हिमाचल प्रदेश) येथे धर्मांध मुसलमानांनी हिंदु तरुणाची हत्या करून त्याच्या शरिराचे ८ तुकडे करून ते नाल्यात फेकल्याच्या घटनेवरून संतप्त नागरिकांनी जिहाद्यांना ‘पुढील ३० दिवसांत हिमाचल प्रदेश सोडून जा’, अशी चेतावणी दिली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी भारतातील मुसलमानांच्या सुरक्षेच्या सूत्रावर चर्चा केली पाहिजे, असा सल्ला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या दोघांच्या भेटीपूर्वी दिला होता.
हिंदु राष्ट्राचा अर्थ देशाची फाळणी करणे आहे. हिंदु राष्ट्राचा अर्थ आहे देशाला नरकात पाठवणे, अशी विधाने बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाचे नेते शिवानंद तिवारी यांनी केली आहेत.