संपूर्ण देशातील महाविद्यालयांमध्ये अशी बंदी घाला !
चेंबूर येथील आचार्य महाविद्यालयात जीन्स आणि टी शर्ट यांवरही बंदी घालण्यात आली आहे. याआधी या महाविद्यालयात हिजाबवर बंदी घालण्यात आली होती. त्याला न्यायालयानेही मान्यता दिली होती.
चेंबूर येथील आचार्य महाविद्यालयात जीन्स आणि टी शर्ट यांवरही बंदी घालण्यात आली आहे. याआधी या महाविद्यालयात हिजाबवर बंदी घालण्यात आली होती. त्याला न्यायालयानेही मान्यता दिली होती.
‘जे स्वत:ला हिंदू म्हणवतात, ते २४ घंटे हाणामारी आणि हिंसाचार यांत गुंतलेले असतात’, असे विधान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले. या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी यांनी आक्षेप घेतला.
अलीगड (उत्तरप्रदेश) येथील शिवमंदिरात लघवी केल्यावरून सोहिल आणि इरफान नावाच्या २ मुसलमान तरुणांना अटक करण्यात आली. हिंदु संघटनांनी ‘या दोन्ही आरोपींची घरे बुलडोजरद्वारे पाडण्यात यावीत’, अशी मागणी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरीच्या भूईकोट गडावरील भारतमातेच्या मूर्तीची नियमित पूजा करण्यात येते. ही पूजा करण्यास बंदी घालण्याचा तुघलकी आदेश पुरातत्व विभागाने दिला आहे.
नेपाळमधील मुसलमानांनी एका गावाचे नाव ‘इस्लामनगर’ ठेवत या नावाचा फलकही लावला आहे. हिंदूंनी नामफलक काढून टाकल्यामुळे मुसलमानांनी काही हिंदु तरुणांना मारहाण केली.
मुंबईच्या चेंबूर येथील ‘आचार्य आणि मराठे महाविद्यालया’ने हिजाबवर घातलेली बंदी योग्य आहे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला. ‘मुसलमान समुदायाला लक्ष्य करणे, हा त्यामागील हेतू नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
संसदेत खासदारकीची शपथ घेतांना भाग्यनगरमधील एम्.आय.एम्.चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी उर्दू भाषेत शपथ घेतली, तसेच त्यांनी ‘जय फिलीस्तिन’ (पॅलेस्टाईन) आणि ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) अशा घोषणा दिल्या.
केंद्रातील भाजप सरकारकडून मुसलमानांना घरे, शौचालये, रस्ते, सरकारी नोकर्या, रेशन आणि प्रतिमहा १ सहस्र २५० रुपये मिळाले; मात्र त्यांनी मतदान काँग्रेसला केले, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी केले.
‘कर्नाटकमध्ये रहाणार्या प्रत्येकाने कन्नडमध्येच बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कन्नड वगळता इतर कोणतीही भाषा राज्यात बोलली जाणार नाही, अशी शपथ सर्वांनी घ्यावी’, असे आवाहन कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तेथील नागरिकांना केले.
उज्जैन (मध्यप्रदेश) येथील ‘विक्रम विद्यापिठा’मध्ये प्रा. अनिश शेख याने हिंदु विद्यार्ध्यांना व्हॉट्सॲप गटात समाविष्ट करून त्यांना नमाजपठण आणि इस्लाम धर्म स्वीकारणे यांचे लाभ सांगिल्यावरून त्याला १५ दिवसांसाठी पदावरून हटवण्यात आले आहे.