भारतीय खेळाडू असे कधी करणार ?
ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट खेळाडू पॅट कमिन्स यांनी भारताला कोरोनाचा सामना करण्यासाठी ३७ लाख, तर ब्रेट ली यांनी ४३ लाख रुपये अर्पण केले आहेत.
ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट खेळाडू पॅट कमिन्स यांनी भारताला कोरोनाचा सामना करण्यासाठी ३७ लाख, तर ब्रेट ली यांनी ४३ लाख रुपये अर्पण केले आहेत.
देशात आलेल्या कोरोनाच्या दुसर्या लाटेला सर्वस्वी तुम्हीच उत्तरदायी आहात. तुमच्या अधिकार्यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवायला हवा, अशा शब्दांत मद्रास उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला फटकारले.
उत्तरप्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे कोरोनाचा संसर्ग झाल्याने नैराश्यग्रस्त झालेल्या एका महिला डॉक्टरने इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केली.
आम्ही भारताची विनंती मान्य करण्याआधी आमच्या नागरिकांना अधिक प्राथमिकता देणार आहोत, असे सांगत अमेरिकेने कोरोना लस बनवण्यासाठी आवश्यक असणार्या कच्च्या मालावरील निर्यात बंदी हटवण्यास नकार दिला.
‘कोरोनाच्या युद्धात धर्म आणि अध्यात्म यांच्याशी असलेला लोकांचा संबंध औषधाच्या रूपात काम करील. कोरोनाबाधितांना बरे करण्यासाठी सस्वर रामचरितमानसचे पठण करणेही वरदान ठरू शकते’, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.
मुंबईत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार विदेशात जात आहेत. अभिनेते शाहरूख खान हे त्यांची पत्नी गौरी आणि मुलगा आर्यन यांच्यासह न्यूयॉर्कला गेले आहेत. अन्य अभिनेते आणि अभिनेत्री यांच्याकडूनही हाच प्रकार होत आहे.
मधुबनी (बिहार) येथील खिरहर गावामध्ये दोघा साधूंची कुदळीने शिरच्छेद करून हत्या करण्यात आली. हे दोन्ही साधू येथील धरोहर नाथ मंदिरात अनेक वर्षांपासून रहात होते. या हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती आंदोलन समितीचे अध्यक्ष अधिवक्ता महेंद्रप्रताप सिंह यांनी येथील दिवाणी न्यायालयात श्रीकृष्णजन्मभूमीचे उत्खनन करण्याची मागणी केली आहे.
मास्क न लावता चारचाकी गाडीतून प्रवास करणार्या दांपत्याला पोलिसांनी अडवल्यावर या दांपत्याने पोलिसांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.
कुंभमेळा होऊच नये, यासाठी सरकारने प्रयत्न केले. साधू-महंतांनी विरोध केल्याने त्याला अनुमती मिळाली.