हिंदूंच्या मंदिरांची स्थिती जाणा !

आंध्रप्रदेशातील श्रीशैलम् मंदिरावर धर्मांधांनी नियंत्रण मिळवले आहे, असा आरोप भाग्यनगर येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी केला आहे. ‘येथील गोशाळेतील गायींची गोमांसासाठी हत्या होत आहे’, असेही त्यांनी म्हटले आहे.

अशी कारवाई संपूर्ण देशात हवी !

उत्तरप्रदेशमध्ये वाहनांच्या क्रमांकाच्या पाट्यांवर जातीचे नाव लिहिण्याची पद्धत चालू आहे. यातून जातीचे महत्त्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे; मात्र आता उत्तरप्रदेशच्या वाहतूक विभागाने अशा प्रकारे जातीची ओळख सांगणार्‍या गाड्यांवर कारवाई करणे चालू केले आहे.

केंद्र सरकारने हे रोखणे आवश्यक !

केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाने सरकारकडे मुसलमानबहुल भागात मुसलमान पोलीस, शिक्षक आणि आरोग्य कर्मचारी तैनात करण्याची शिफारस केली असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

जर्मनीतील पाद्रयांचे स्वरूप जाणा !

जर्मनीमध्ये कॅथॉलिक ननकडून चालवल्या जाणार्‍या ‘चिल्ड्रन होम’मधील अनाथ मुलांवर वर्ष १९४६ ते २०१४ या काळात सुमारे १ सहस्र ६७० पाद्री, राजकीय नेते, नन यांनी ३ सहस्र ६७७ मुलांवर लैंगिक अत्याचार केले.

हे बंगाल सरकारला लज्जास्पद !

सर्वोच्च न्यायालयात पुनीत कौर ढांडा यांनी याचिका प्रविष्ट करून बंगालच्या मुसलमानबहुल मालदा, उत्तर दिनाजपूर, मुर्शिदाबाद, नादिया, कूचबिहार, कोलकाता, उत्तर २४ परगणा आणि दक्षिण परगणा या भागांत हिंदूंना मतदान करू दिले जात नाही, असे म्हटले आहे.

भारतातील हिंदूंनीही विरोध करावा !

श्रीलंकेतील अधिवक्त्या जीवनी करियावसम् यांनी श्री महाकालीदेवीचे अश्‍लील चित्र फेसबूकवर पोस्ट केल्याच्या कृत्याला येथील हिंदु संघटनांनी विरोध केला आहे. जीवनी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या संघटनांनी केली आहे.

ढोंगी निधर्मी प्रसारमाध्यमांचे अशा घटनांवरील मौन जाणा !

सीबीआय न्यायालयाने केरळमध्ये २८ वर्षांपूर्वी घडलेल्या सिस्टर अभया हत्येच्या प्रकरणात पाद्री थॉमस कोट्टूर आणि सिस्टर सेफी यांना दोषी ठरवले आहे. कोट्टायम येथील एका कॉन्व्हेंटमध्ये सिस्टर अभया वास्तव्य करत होत्या.

हिंदूंचे रक्षण कधी होणार ?

केरळ येथे अभिनंथ या २७ वर्षीय हिंदु तरुणाने मुसलमान तरुणीशी विवाह करून इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे अभिनंथ आणि त्याची आई लेखा यांच्यावर धर्मांधांनी आक्रमण केले.

भारतात अशी कठोर कारवाई कधी होणार ?

इस्लामी आतंकवादी संघटना ‘मुस्लिम ब्रदरहुड’वर टीका करणे आणि तिचा निषेध करण्यास नकार दिल्याने सौदी अरेबियाच्या सरकारने देशातील १०० इमाम आणि मौलवी यांची पदावरून हकालपट्टी केली आहे.

हिंदूंच्या मंदिरांचा निधी धर्मासाठी खर्च व्हावा ! 

पूरग्रस्तांच्या साहाय्य निधीसाठी केरळच्या गुरुवायूर मंदिराकडून प्राप्त झालेले १० कोटी रुपये मंदिराला परत करण्याचा आदेश केरळ उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला.