केंद्र सरकारनेच असा आदेश द्यावा !
उत्तरप्रदेश सरकारने कोरोना काळात गायींसाठी स्वतंत्र साहाय्य कक्ष स्थापन करण्याचा आदेश दिला आहे. गोशाळेत गायी आणि अन्य जनावरे यांसाठी सर्व आरोग्य सुविधा, ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
उत्तरप्रदेश सरकारने कोरोना काळात गायींसाठी स्वतंत्र साहाय्य कक्ष स्थापन करण्याचा आदेश दिला आहे. गोशाळेत गायी आणि अन्य जनावरे यांसाठी सर्व आरोग्य सुविधा, ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
भारतातील कोरोनाचे वाढते संकट दूर होण्यासाठी इस्रायलमध्ये शेकडोंच्या संख्येने ज्यू नागरिकांनी एकत्र येऊन ‘ॐ नमः शिवाय ।’ हा जप आणि प्रार्थना केली.
केंद्रीय विज्ञान मंत्रालयाने ‘गायत्री मंत्राने कोरोना बरा होऊ शकतो का ?’ यावर संशोधन करण्यासाठी हृषिकेश येथील एम्स रुग्णालयाला ३ लाख रुपयांंचा निधी दिला आहे.
कर्नाटक राज्य प्रशासन बेंगळुरू येथील कोणत्याही रुग्णालयात रुग्णाला खाट उपलब्ध करून देण्यासाठी लाच घेत आहे, असा आरोप भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी केला आहे.
कोरोनामुळे बेंगळुरू शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीमध्ये अनेक घंटे रांगेत उभे रहावे लागत आहे. चामराजपेटमधील एका स्मशानभूमीबाहेर तर ‘हाऊस फुल’ असा फलकच लावण्यात आला आहे.
आळेफाटा परिसरात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गोरक्षक तथा मानद पशूकल्याण अधिकारी श्री. शिवशंकर स्वामी यांच्यावर गोमाफियांकडून आक्रमणाचा प्रयत्न करण्यात आला. श्री. स्वामी यांचे वाहनचालक आणि प्रशासकीय सुरक्षारक्षक यांच्यामुळे बचावले.
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा विजय झाल्यानंतर काही ठिकाणी भाजपच्या कार्यालयांवर आक्रमणे करण्यात आली. एका ठिकाणच्या कार्यालयाला आगही लावण्यात आली, तर एका उमेदवारावर दगडफेक करण्यात आली. भाजपने याविषयी कारवाईची मागणी केली आहे.
प्रसिद्ध पत्रकार आणि सूत्रसंचालक रोहित सरदाना यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे नोएडा येथील मेट्रो रुग्णालयात निधन झाले. सरदाना यांच्या निधनानंतर सामाजिक माध्यमांतून काही धर्मांधांनी आनंद व्यक्त करणारे ट्वीट्स केले आहेत.
६२ वर्षे असलेली निवृत्तीची वयोमर्यादा वाढवावी, या मागणीसाठी महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षक संघटनेने १ मेपासून संपावर जाण्याची चेतावणी दिली आहे. या संघटनेचे १ सहस्र २०० सदस्य आहेत.
कोरोना रोखण्यासाठी अष्टविनायकांपैकी एक असलेले श्री लेण्याद्री गणपति देवस्थान, शिर्डी येथील श्री साई देवस्थान, शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थान, वडोदरा (गुजरात) येथील श्री स्वामी नारायण मंदिर आदी विविध देवस्थाने साहाय्य करत आहेत.