सिंधुदुर्ग ते मुंबई ‘शिवशौर्य यात्रा’ : उद्या दोडामार्ग येथून प्रारंभ
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदूंनी मोठ्या संख्येने आणि पारंपरिक वेषात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यटन व्यवसायामध्ये रोजगार निर्मितीची क्षमता ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत, गोवा
येत्या ४-५ वर्षात आदरातिथ्य क्षेत्रात सुमारे २ लाख तरुणांना रोजगार देण्याची क्षमता ! ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘व्होकल फॉर ग्लोबल’ या संकल्पनांना चालना देण्यासाठी उद्योग समर्थनाच्या महत्त्वावरही त्यांनी भर दिला.
ब्रह्मीभूत स्वामी वरदानंद भारती यांची ‘वरदवाणी’ !
शासनकर्ता दुःखाला, कष्टाला, संकटाला वा लोकांमध्ये होऊ शकणार्या अप्रियतेला कंटाळून हानीचे भय बाळगणारा आणि त्यामुळे वाटले तसा वागणारा असा राजा नसावा. तो खर्या अर्थाने धर्मनिष्ठ असावा.
सिंधुदुर्ग किल्ल्यावर २७ सप्टेंबर या दिवशी जागतिक पर्यटन दिन साजरा होणार
‘पर्यटन आणि हरित गुंतवणूक’ ही ‘जागतिक पर्यटन वर्ष २०२३’ ची जागतिक संकल्पना (थीम) असून त्यानुसार हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचा प्रारंभ सकाळी ९ वाजता स.का. पाटील महाविद्यालय, मालवण येथे होणार आहे.