हिंदूबहुल भारतात ‘हिंदु’ म्हणून झालेले आघात !

उत्तरप्रदेश
अलीगड : येथे देहलीतील एका हिंदु महिलेने अन्सार अली नावाच्या व्यक्तीवर फसवणूक, बळजबरीने विवाह आणि गंभीर छळ यांचे आरोप केले आहेत. अन्सारने आरंभी ‘राहुल’ अशी स्वत:ची खोटी ओळख सांगून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. विवाहाचे आश्वासन देत तिच्याशी एका मंदिरात विवाहही केला. विवाहानंतर तिला त्याचे खरे नाव समजले. यावरून अन्सार तिच्यावर निकाह (इस्लामी पद्धतीने विवाह) करण्यासाठी दबाव आणू लागला. त्यानंतर तिला तीन तलाक देण्यात आला आणि ‘हलाला’ची (इस्लाममध्ये मुसलमानाने पत्नीला तलाक दिल्यावर त्याला पुन्हा त्याच तरुणीशी विवाह करायचा असल्यास त्या महिलेला अन्य पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवावे लागण्याचा प्रकार) मागणी करण्यात आली. त्याने तिला गुंगीचे इंजेक्शन देऊन शोषण केले, तिला ओलीस ठेवले आणि अगदी तिची विक्री करण्यापर्यंत त्याची मजल गेली होती, असा आरोप पीडित हिंदु महिलेने केला. याप्रकरणी गुन्हा नोंदवून पोलीस अन्वेषण करत आहेत.
हरडोई : येथे सलमानने एका १९ वर्षीय हिंदु युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. युवतीच्या कुटुंबियांनी याला विरोध केला असता त्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावण्यात आले. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला.
मध्यप्रदेश
इंदूर : बजरंग दल आणि विहिंप यांच्या कार्यकर्त्यांनी राजस्थानचा रहिवासी इरफान खान याला एका बसमध्ये पकडले. इरफान बिहारमधील एका हिंदु मुलीला बळजोरीने कोटा येथे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. मुलीने सांगितले की, इरफानने तिला इंदूरला बोलावले. तो इच्छेविरुद्ध तिच्यावर कोटा येथे जाण्यासाठी दबाव आणत होता. इरफानला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
उत्तराखंडमधून समोर आली धर्मांतराच्या प्रयत्नाची १ घटना !
पिथोरागड जिल्ह्यातील गंगोलीहाट येथे विवेक सिंह या हिंदु तरुणाने देहलीतील यास्मिन नावाच्या मुसलमान महिलेवर गंभीर आरोप केले. विवेक यांनी म्हटले, ‘प्रेमसंबंधांच्या बहाण्याने या महिलेने माझ्यावर धर्मांतरासाठी दबाव आणला आणि नकार दिल्यामुळे जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच माझ्या मुलाची बळजबरीने सुंता करण्यात आली.’ याप्रकरणी यास्मिन आणि तिचे आई-वडील अन् अन्य नातेवाईक अशा ४ सदस्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
गूगलचे ‘जेमिनी’ एआय संकेतस्थळ ‘जय श्रीराम’ला प्रतिसाद देते, तर ‘सिरि’ का देऊ शकत नाही ? – हिंदुत्वनिष्ठांचा प्रश्न
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
वारकरी संप्रदायातील घुसखोर ओळखा !
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !