
कोपनहेगन (डेन्मार्क) – युरोपीय देश डेन्मार्क लवकरच रस्त्यांवर नमाजपठण करण्यावर आणि अजान (मुसलमानांना मोठ्या आवाजात नमाजासाठी आमंत्रित करणे) यांवर बंदी घालण्याचा विचार करत आहे.
🚨 Denmark Revives Push to Ban Roadside Namaz & Azaan
Immigration Minister Morten Bødskov said the call to prayer "has no place in Denmark" and that people should never feel they've "walked into a suburb of Islamabad" while in Denmark.
The move comes amid PM Mette Frederiksen's… pic.twitter.com/IsOvgkuRau
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 25, 2026
डेन्मार्कचे मंत्री मॉर्टन बोडस्कोव्ह यांनी सांगितले, ‘रस्त्यांवर नमाजपठण करणे आणि अजान यांवर बंदी लागू केली जाऊ शकते का ?’, याविषयी अधिकारी कायदेशीर पडताळणी करण्यास पुन्हा प्रारंभ करतील. कोपनहेगनसह काही भागांत ध्वनीप्रदूषणाशी संबंधित कडक नियमांमुळे उघड्यावर नमाजपठण करण्यावर आधीपासूनच बंदी आहे; परंतु आता डेन्मार्क सरकार आणखी कडक बंदीचा विचार करत आहे. डेन्मार्कमध्ये मशिदींमधून दिवसातून ५ वेळा दिल्या जाणार्या अजानला थारा नाही. डेन्मार्कच्या छतांवरून अजानचा आवाज ऐकू यायला नको. डेन्मार्कमध्ये याला कोणतीही जागा नाही आणि जेव्हा तुम्ही डेन्मार्कमध्ये फिराल, तेव्हा तुम्हाला अशी शंका यायला नको की, तुम्ही इस्लामाबादमधील (पाकिस्तानची राजधानी) एखाद्या परिसरात आला आहात.’
डेन्मार्कमध्ये यापूर्वी वर्ष २०२० आणि वर्ष २०२५ मध्येही यावर चर्चा झाली होती; परंतु देशभरात बंदी लागू होऊ शकली नव्हती.
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान
गोव्यात कॅसिनोंमधील ‘गेमिंग’ क्षेत्रात २१ वर्षांखालील व्यक्तीला प्रवेश बंदी
हवामान खात्याचा नव्हे, तर पंचांगाचा अंदाज खरा ठरला ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
लातूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा सुनील कच्छवे यांनी पदभार स्वीकारला !