
नवी देहली – पारपत्र केवळ भारतीय नागरिकांनाच दिले जात असले, तरी त्यावरून एखाद्या व्यक्तीचे नागरिकत्व सिद्ध होत नाही, असे केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मतदार सूचीच्या सखोल पुनरावलोकन मोहिमेच्या वेळी असाच एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. ‘आधार कार्ड’ हा केवळ ओळखीचा पुरावा असून तो नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नाही’, असे न्यायालयाने म्हटले होते.
परराष्ट्र मंत्रालयाने नवीन ‘चिप-आधारित’ ‘ई-पासपोर्ट’विषयी माहिती दिली. या पारपत्रामध्ये ‘बायोमेट्रिक डेटा’ सुरक्षित ठेवला जात असल्याने जागतिक स्तरावर त्याला सहज संमती मिळते, तसेच फसवणूक आणि बनावट पारपत्र सिद्ध होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर अल्प होतो, असे मंत्रालयाने सांगितले.
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !
श्रीरामांचा अवमान केल्यामुळेच कट्टर शहरी नक्षलवादी अभिजीत दिपके यांच्यावर शाई फेकली ! – Barkha Trehan
US Indians Deportation : अमेरिका १८ सहस्र भारतीय नागरिकांना देशाबाहेर काढणार !
कर्नाटकात शाळांजवळ पिझ्झा-बर्गर यांच्या विक्रीवर लवकरच बंदी !
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !