
थिरुवनंतपूरम् (केरळ) – ‘एलोहिम ग्लोबल वर्शिप सेंटर’चे पाद्री बिनू वझामुट्टोम यांच्यावर अल्पवयीन मुलांना मारहाण केल्याचा आणि डांबून ठेवून त्यांच्याकडून बलपूर्वक श्रम करून घेतल्याचा आरोप आहे. इडुक्की जिल्ह्यातील अनक्कारा येथे रहाणार्या एका १७ वर्षांच्या मुलाने या पाद्रीच्या विरोधात तक्रार केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. आरोपी पाद्रीच्या विरोधात लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली आणि पाद्रीच्या अटकेची मागणी केली. (‘वर्शिप सेंटर’च्या नावाखाली चाललेला प्रकार जाणा ! – संपादक)
Kerala: Angry citizens take to the streets against Pastor Binu Vazhamuttom of the ‘Elohim Global Worship Centre’ accused of assaulting minor children!
Can the pro-Christian Congress government in Kerala be expected to take strict action against the accused Christian pastor?… pic.twitter.com/sW9BUbOeiQ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 26, 2026
१. पाद्री बिनू वझामुट्टोम् यांच्याकडून चालवल्या जाणार्या ‘स्नेहथानल’ या संस्थेमध्ये अल्पवयीन मुलांना मारहाण करण्यात आली. तसेच त्यांना अवैधरित्या डांबून ठेवून त्यांच्याकडून श्रमाची कामे करून घेण्यात आली.
२. केरळमधील पथानामथिट्टा येथे २१ जून २०२६ या दिवशी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘एलोहीम ग्लोबल वर्शिप सेंटर’च्या बाहेर निदर्शने करत पादरीच्या अटकेची मागणी केली.
३. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्राच्या आसपास अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा