
मुंबई – अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने राज्यात ‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ मोहीम चालू करण्यात आली आहे. त्या माध्यमातून ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणार हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबे यांच्या मालकांना सोडणार नाही, अशी चेतावणी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. ‘प्रशासनाने आखून दिलेल्या नियमानुसार हॉटेलचे स्वयंपाकघर असावे, त्यामध्ये अस्वच्छता दिसल्यास कुणालाही सोडणार नाही’, अशी चेतावणी त्यांनी दिली.
⚠️ Mumbai: Hotels, restaurants & dhabas violating food safety regulations will face strict action, warns Commissioner Tukaram Mundhe.
✅ Free, clean drinking water must be provided to customers.
🥗 Vegetarian & non-vegetarian food must be prepared and stored separately.
PC:… pic.twitter.com/fQYwovIq7X
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 26, 2026
हॉटेलमधील स्वयंपाकघर कसे असावे ?, याविषयी आयुक्तांनी सांगितलेले नियम !
१. भिंती आणि लादी येथे टाईल्स लावलेल्या असाव्यात.
२. त्या टाईल्स धुता येण्यासारख्या असाव्यात. त्यांतून पाणी झिरपू नये.
३. पुरेशी हवा खेळती असावी.
४. एक्झॉस्ट (गरम हवा बाहेर घालवणारा पंखा) असावा.
५. कच्च्या मालासाठी आणि स्वयंपाक बनवण्यासाठी वेगळा विभाग असावा.
६. कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगळे असावे.
७. शाकाहारी आणि मांसाहारी अन्न वेगवेगळे ठेवावे.
८. इलेक्ट्रॉनिक फ्लाय ट्रॅप (माशा पकडण्याचे इलेक्ट्रॉनिक साधन) बसवावेत.
९. पेस्ट कंट्रोल (किटकांचा त्रास न्यून करण्याची प्रक्रिया) नियमित करावे.
१०. अन्नाच्या ठिकाणी किडे, झुरळे, पाली, उंदीर यांचा प्रादुर्भाव नसावा.
११. ग्राहक हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांच्यासाठी पाणी, साबण, हात पुसण्यासाठी पंचा ठेवावा.
१२. ग्राहकांना शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी विनामूल्य उपलब्ध करून द्यावे.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न