ब्राझिलचे पत्रकार आणि भू-राजकीय विश्लेषक पेपे एस्कोबार यांचा दावा

ब्राझिलिया (ब्राझिल) – ब्राझिलचे पत्रकार आणि भू-राजकीय विश्लेषक पेपे एस्कोबार यांनी दावा केला आहे की, ‘इस्रायलची गुप्तचर संघटना ‘मोसाद’ने पाकिस्तानचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या हत्येचा कट रचला होता. अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेसाठी पाकिस्तानी शिष्टमंडळ स्वित्झर्लंडला गेल्यानंतर हा कट कार्यान्वित केला जाणार होता.’ पेपे यांच्या या दाव्यामुळे पाकिस्तानसह संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे.
पेपे एस्कोबार यांचा नेमका दावा काय ?
पेपे एस्कोबार यांनी ऑस्ट्रेलियाचे उद्योजक आणि राजकीय भाष्यकार मारियो नॉफाल यांच्याशी नुकतीच ‘एक्स’वरून चर्चा केली. ते म्हणाले की, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या आदेशावरून ‘मोसाद’ जिनेव्हामध्ये असीम मुनीर आणि त्यांच्या शिष्टमंडळातील सदस्य यांची हत्या करण्याचा कट रचत असल्याची माहिती पाकच्या सैनिकी गुप्तचर यंत्रणेला अत्यंत विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली होती. इराण-अमेरिका शांतता करारावर इस्रायल प्रचंड अप्रसन्न होता; कारण या प्रक्रियेतून त्यांना बाजूला ठेवण्यात आले होते. तसेच लेबनॉनमधील इस्रायलच्या सैनिकी कारवायांमुळे हा करार मोडण्याचा धोका निर्माण झाला होता. मोसादच्या या कटाची माहिती मिळताच पाकिस्तानने ओमानच्या माध्यमातून इस्रायलला थेट आणि कडक शब्दांत संदेश पाठवला होता. त्यात ‘आमच्या शिष्टमंडळाला हात लावला, तर आम्ही तुम्हाला नकाशावरून मिटवून टाकू’, अशी चेतावणी देण्यात आली होती.
पेपे यांनी असा दावाही केला की, सार्वजनिक ठिकाणी मांडलेल्या परिस्थितीपेक्षा प्रत्यक्ष परिस्थिती त्यापेक्षा वेगळी आहे.
या हत्येच्या कटाविषयी इस्रायल किंवा पाकिस्तान यांच्या अधिकृत अधिकार्यांकडून अद्याप कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. याखेरीज स्वित्झर्लंड, अमेरिका आणि पाकिस्तान यांच्या सुरक्षा यंत्रणांनीही या परिषदेच्या काळात अशा प्रकारच्या कोणत्याही धोक्याविषयी कोणतीही सतर्कतेची चेतावणी दिली नव्हती. त्यामुळे अधिकृत माहिती समोर येईपर्यंत या दाव्यांकडे सावधगिरीने पहाण्याची आवश्यकता असल्याचे तज्ञांचे मत आहे.
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
Suhail Arrested : श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचा कट रचणार्या सुहेल याला कर्नाटकमधून अटक
Seelampur Murder : देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूरमध्ये १६ वर्षांच्या हिंदु मुलाची मुसलमानांकडून निर्घृण हत्या
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
बांगलादेशात गेल्या ५ महिन्यांत हिंदूंविरुद्ध ६४५ गुन्हे !