सिंधुदुर्ग : राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारणीच्या कामाला वेग
राज्यशासन आणि नौदल यांनी निश्चित केलेल्या भूमीवर पुतळा उभारणी अन् सुशोभीकरण यांचे काम चालू ! या अनुषंगाने नौसेनेचे वेस्टर्न नेव्हल कमांड चीफ ऑफ स्टाफ व्हॉईस ॲडमिरल संजय भल्ला यांनी राजकोट किल्ल्याची पहाणी केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मालवण येथील ‘राजकोट’ किल्ल्यावर उभारण्यात येणार !
सिंधुदुर्ग किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी मालवण किनारपट्टीवर पद्मगड, राजकोट आणि सर्जेकोट हे किल्ले बांधण्यात आले. मालवणच्या किनार्यावर उत्तरेकडे खडकाळ आणि काहीसा उंच भाग आहे. या जागी ‘राजकोट’ किल्ला बांधण्यात आला होता.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘शिवशौर्य यात्रे’मुळे वातावरण शिवमय !
हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने ‘शिवशौर्य यात्रे’च्या सिंधुदुर्ग परिक्रमेला प्रारंभ करण्यात आला. तेथून यात्रेचे बांदा, सावंतवाडी, कुडाळ येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येऊन मालवण येथे सायंकाळी आगमन झाले.