बांगलादेशात गेल्या ५ महिन्यांत हिंदूंविरुद्ध ६४५ गुन्हे !

९५ मंदिरांमध्ये तोडफोड

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात १२ फेब्रुवारी २०२६ या दिवशी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर अल्पसंख्यांकांच्या विरोधात आतापर्यंत ६४५ गुन्ह्यांची नोंद झाली. सामाजिक माध्यमांवर हिंदु समाज आणि इस्कॉन यांना लक्ष्य करून प्रक्षोभक मजकूर प्रसारित केला जात आहे, अशी माहिती मानवी अधिकार संघटना ‘ए.एस्.के.’, बांगलादेश हिंदु-बौद्ध-ख्रिश्चन ऐक्य परिषद आणि एच्.आर्.सी.बी.एम्. यांच्या आकडेवारीतून समोर आली आहे.

१. मुसलमानांच्या स्थानिक सभांत अल्पसंख्यांकांचा सामाजिक बहिष्कार घालण्याची आणि त्यांच्या संघटनांवर बंदीची मागणी होत आहे. अनेक ठिकाणी हिंदूंना धमक्याही देण्यात आल्या.

२. मानवी अधिकार संघटनांच्या माहितीनुसार हिंदूंच्या भूमी बळकावण्याच्या १३२ घटना समोर आल्या. अनेक कुटुंबांनी त्यांना घरातून हाकलून देण्याच्या धमक्या दिल्या गेल्याच्या, तसेच घरांची तोडफोड झाल्याच्या तक्रारीही नोंदवल्या आहेत. ९५ मंदिरांची तोडफोड आणि विटंबना करण्यात आली आहे.

३. कुमिल्ला येथील रहिवासी नंदित कुमार यांच्या मते, हिंदुविरोधी वातावरण सर्वाधिक प्रमाणात सामाजिक माध्यमांद्वारे निर्माण केले जात आहे. कटकारस्थानाचा संशय निर्माण करणारे संदेश सातत्याने प्रसारित होत आहेत. अशा प्रकारच्या सामुग्रीवर त्वरित नियंत्रण आणले नाही, तर परिस्थिती कधीही बिघडू शकते. गाइबांधा येथील श्रीराम मूर्तीच्या स्थापनेला विरोध, हा मोठ्या राजकीय कारस्थानाचा भाग असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

४. बांगलादेश हिंदु-बौद्ध-ख्रिश्चन ऐक्या परिषदेचे सरचिटणीस मोनिंद्र कुमार नाथ यांच्या मते, कोणत्याही समुदायासाठी केवळ प्रत्यक्ष हिंसाचारच नव्हे, तर सातत्याने दिल्या जाणार्‍या धमक्याही भीतीचे कारण ठरतात. उघडपणे धमक्या देणार्‍यांवर कारवाई न झाल्यास लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास अल्प होतो.

प्रशासकीय निष्क्रियता

मानवी अधिकार संघटनांचा आरोप आहे की, प्रशासनाकडून आरोपींवर पुरेशी आणि प्रभावी कारवाई होत नसल्यामुळे अल्पसंख्यांक समाजात असुरक्षिततेची भावना वाढली असून त्यांचा विश्वासही ढळत आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेशात कुणाचेही सरकार आले, तरी ते धर्मांधांचेच असणार, हे उघड असल्याने या घटना कधीही थांबणार नाहीत ! तेथील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी प्रथम भारतात हिंदु राष्ट्र स्थापन झाले पाहिजे !