आगरा (उत्तरप्रदेश) येथील २ सख्ख्या बहिणींच्या धर्मांतराचे प्रकरण
भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये युवतींना ओढले जात होते प्रेमाच्या जाळ्यात
इस्लामिक स्टेटशीही संबंध

आगरा (उत्तरप्रदेश) – येथील सदर परिसरातील २ सख्ख्या बहिणींच्या धर्मांतर प्रकरणात अटकेत असलेल्या १४ आरोपींविरुद्ध अतिरिक्त सत्र न्यायाधीश ज्योत्स्ना सिंह यांनी अपहरण, धर्मांतर आणि आतंकवादी कारवायांमध्ये सहभाग असण्यासारखे गंभीर दोषारोप निश्चित केले. आरोपींनी हे आरोप फेटाळून लावत खटला चलवण्याची मागणी केली. या प्रकरणात आता ७ जुलैपासून साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया चालू होईल.
Agra: Chargesheet Filed Against 14 in International 'Love Jihad' Conspiracy
Women were lured into relationships across multiple Indian states; links to the Islamic State are under investigation.
According to some interpretations, Love Jihad and the religious conversion of… pic.twitter.com/1SAJuCZlZz
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 25, 2026
काय आहे प्रकरण ?
२४ मार्च २०२५ या दिवशी दोन सख्ख्या हिंदु बहिणी घरातून बेपत्ता झाल्या. दोघींना कोलकात्यात नेऊन त्यांचे धर्मांतर करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पथकांनी ६ राज्यांतून २ तरुणींसह १४ आरोपींना कह्यात घेतले. अन्वेषणातून समोर आले की, धर्मांतर घडवून आणणार्या या टोळीची पाळेमुळे अमेरिका, कॅनडा यांसह अनेक देशांत पसरली आहेत.
पीडितेचे ‘एके-४७’ रायफलसह छायाचित्र आले समोर !
पोलिसांना या टोळीचे इस्लामिक स्टेटशी संबंध असल्याचे पुरावेही मिळाले. आरोपी भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये कमी वयाच्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, लव्ह जिहाद आणि इतर मार्गांनी प्रभावित करून त्यांचे धर्मांतर करत असत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये समावेश असलेल्या एका पीडितेचे छायाचित्र समोर आले. यात ती धर्मांतरानंतर ‘एके-४७’ रायफलसह दिसत आहे.
या १४ जणांच्या विरोधात आहे दोषारोपपत्र !
एस्.बी. कृष्णा उपाख्य आयेशा, रिथ बनिक उपाख्य महंमद इब्राहिम, उशामा खान, शेखर रय उपाख्य हसन अली, जुनैद कुरेशी, अबू तालिब, महंमद रहमान कुरेशी, अब्दुर रहमान, महंमद अली उपाख्य पीयूष पवार, मनोज कनोजिया उपाख्य मुस्तफा, अब्दुल रहमान उपाख्य महेंद्र पाल सिंह, जुनैद कुरेशी (द्वितीय), अब्दुल रहीम आणि अब्दुल्ला
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati