पैसे देऊन रुग्णाला गप्प करण्याचा प्रयत्न !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – लोनी येथील एका खाजगी रुग्णालयात डॉक्टर नदीम याने देहलीत रहाणार्या नूर सबा नावाच्या रुग्णाची चुकीची नस कापली. रुग्ण महिलेला याविषयी समजताच तिने विरोध केला, तेव्हा डॉक्टर म्हणाले की, ही अल्लाची इच्छा आहे. इतकेच नाही, तर डॉक्टराने कुटुंबाला ५००-१००० रुपये देऊन गप्प रहाण्यास सांगितले. (अशा प्रकारे रुग्णाच्या जिवाशी खेळणार्या दायित्वशून्य डॉक्टरावर कठोर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक) ‘दिल्ली अपडेट’ नावाच्या ‘यू ट्यूब चॅनेल’वर हे प्रकरण समोर आले.
१. देहलीतील करदम पुरी येथे रहाणारी नूर सबा लोनी येथील ‘अलवी नर्सिंग होम’मध्ये गॉल ब्लॅडरच्या (पित्ताशयाच्या) उपचारासाठी गेली होती. तिथे तिची शस्त्रक्रिया झाली होती; परंतु, १५-२० दिवसांनंतर पुन्हा समस्या चालू झाली आणि नूर सबा त्याच नर्सिंग होममध्ये पुन्हा उपचारासाठी गेली.
२. नर्सिंग होममध्ये तपासणी केल्यानंतर तिला कावीळ झाल्याचे सांगण्यात आले. कावीळ होण्याचे कुठलेही कारण तिला सांगण्यात आले नाही. ती दुसर्या रुग्णालयात उपचारासाठी गेली. तेथे समजले की, शस्त्रक्रियेच्या वेळी तिची नस कापली गेली होती, म्हणूनच तिच्यात काविळीची लक्षणे दिसत होती. या रुग्णालयात तिची पुन्हा शस्त्रक्रिया झाली आणि नूर बरी झाली.
३. त्यानंतर ती जाब विचारण्यासाठी लोनीच्या नर्सिंग होममध्ये पोचली. येथे डॉक्टर नदीम आणि त्याचे साथीदार यांनी नूर सबाला सांगितले की, ही अल्लाची इच्छा आहे. तिने डॉक्टरला विचारले की, जर तिचा मृत्यू झाला असता तर? यावर डॉ. नदीम म्हणाला, ‘हीसुद्धा अल्लाची इच्छा’ आहे. नूरने जेव्हा विरोध केला, तेव्हा तिला पैसे देऊन प्रकरण संपवण्याची भाषा करण्यात आली. (अल्लाचे नाव घेऊन चुकीची कृती करणार्या डॉक्टरला रुग्णालय व्यवस्थापनाने वैद्यकीय पेशासाठी अपात्र ठरवणेच योग्य आहे ! – संपादक)
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय