मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !

मयंक लोहार

मुंबई – २३ जून या दिवशी मुंबईतील लोकल रेल्वेमध्ये मयंक लोहार या २२ वर्षीय युवकाची क्षुल्लक कारणावरून रोशन सुवर्णा नावाच्या युवकाने चाकूने वार करून निघृण हत्या केली. काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी २५ जून या दिवशी औचित्याच्या सूत्राअतंर्गत विधानसभेत या गंभीर घटनेचा उल्लेख करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबई लोकल रेल्वेमध्ये अशी घटना घडणे अतिशय गंभीर असल्याचे नमूद करत २९ जून या दिवशी अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी विधानसभेत निवेदन करण्याचे निर्देश सरकारला दिले.