केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यसभेत दिली माहिती
नवी देहली – गेल्या ५ वर्षांच्या कालावधीत जम्मू-काश्मीरमध्ये ३४ हिंदूंच्या हत्या झाल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यसभेत दिली. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले की, ऑगस्ट २०१९ मध्ये तत्कालीन जम्मू-काश्मीर राज्याला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रहित झाल्यानंतर म्हणजे गेल्या साधारण पावणे तीन वर्षांच्या कालावधीत जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून ४ काश्मिरी हिंदूंची हत्या करण्यात आली. नुकतेच बालकृष्ण नावाच्या एका काश्मिरी हिंदूवर आतंकवाद्यांनी आक्रमण केले होते.
गृह राज्यमंत्री राय यांनी लेखी स्वरूपात दिलेल्या उत्तरामध्ये सरकारने काश्मीर खोऱ्यात अल्पसंख्यांक (हिंदु) समुदायाची सुरक्षा निश्चित करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्याचेही सांगितले.
घुसखोरीच्या घटना आणि आतंकवादी आक्रमणे यांच्या संख्येत घट !गृह राज्यमंत्री राय यांनी काश्मीरमध्ये सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीमध्ये पुष्कळ घट झाल्याचेही नमूद केले. त्याची आकडेवारी खाली दिली आहे. घुसखोरी रोखण्यासाठी केलेल्या विविध सरकारी उपाययोजनांमुळे ही घट झाल्याचा सरकारने दावा केला. सरकारने आतंकवादाच्या विरोधात ‘झिरो टॉलरन्स’ () भूमिका स्वीकारल्याने जम्मू- काश्मीरमध्ये आतंकवादाच्या घटना न्यून झाल्याचेही केंद्रीय गृह राज्यमंत्री म्हणाले. |