श्री दत्त परिवार आणि मूर्तीविज्ञान

दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती दिलेला. दत्त म्हणजे आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत’, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे असा.

दत्ताच्या निर्गुण तत्त्वाच्या पादुकांचे महत्त्व

‘शिव, मारुति, श्रीकृष्ण, श्रीराम, दत्त, गणपति आणि श्री दुर्गादेवी या सप्तदेवतांपैकी केवळ दत्ताच्याच पादुका असतात आणि त्यांचीच पूजा देवळात अथवा घरी केली जाते. साधकाला पादुकांमधून प्रक्षेपित होणार्‍या निर्गुण तत्त्वाचा लाभ होतो.

‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।’ या नामजपाचा भावार्थ

‘सर्व रूपांच्या समुच्चयातून निर्माण झालेला, दत्ताचे गुणगान आणि महती वर्णन करणारा, आवाहनात्मक मंत्र म्हणजे ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।’

दत्तजयंती संदर्भातील धर्मशास्त्र

दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा लाभ मिळण्यास साहाय्य होते.

दत्तात्रेय अवतार

अत्री आणि अनसूयेने देवांना ‘त्यांनी आपले पुत्र म्हणून रहावे’, असा वर मागितला. तेव्हा देव म्हणाले, ‘दत्त’ म्हणजे ‘दिला.’ अत्रींचा पुत्र म्हणून आत्रेय. अशा रीतीने ‘दत्तात्रेय’ असे नाव त्यांना मिळाले.

श्रीक्षेत्र नारायणपूर येथील श्रीदत्त जन्मोत्सवाची सिद्धता पूर्ण !

श्रीक्षेत्र नारायणपूर येथील श्रीदत्त जन्मोत्सवाची सिद्धता पूर्ण झाली असून सातारा जिल्ह्यातील दत्त भक्तांच्या दिंड्या आणि पालख्या मार्गस्थ झाल्या आहेत. श्रीक्षेत्र नारायणपूर येथे १६ डिसेंबरपासून श्रीदत्तजयंती उत्सवास प्रारंभ होत आहे.

पूर्वजांचे त्रास दूर होण्यासाठी पितृपक्षात दत्ताचा नामजप, प्रार्थना आणि श्राद्धविधी करा !

‘सध्या अनेक साधकांना वाईट शक्तींचे त्रास होत आहेत. पितृपक्षात (२१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ या काळात) हा त्रास वाढत असल्याने त्या कालावधीत प्रतिदिन ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ हा नामजप न्यूनतम १ घंटा करावा.

श्वासाला जोडून नामजप करतांना साधकाला ‘स्वतःचा स्थूल देह घरी नामजप करत असून सूक्ष्म देह नृसिंहवाडी येथील दत्तमंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घालत आहे’, असे दिसणे आणि त्रासदायक आवरण दूर होणे

‘माझा स्थूल देह जयसिंगपूर येथील घरी नामजप करत आहे आणि त्याच वेळी माझा सूक्ष्म देह श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तमंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घालत आहे.’ मला हे दृश्य स्पष्टपणे घरी बसून दिसत होते.

पितृपंधरवड्याच्या कालावधीत पूर्वजांना गती  मिळण्याविषयी साधिकेला आलेल्या अनुभूती

वर्ष २०१८ मध्ये पितृपंधरवडा चालू असतांना माझ्या मानसिक त्रासात वाढ झाल्याचे माझ्या लक्षात आले. देवानेच मला त्यावर मात करायला बळ दिले. अष्टमीच्या दिवशी मी ध्यानमंदिरात दत्तगुरूंचा नामजप करण्यासाठी बसले असतांना मला पुढील दृश्य दिसले…

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न केले, तर प्रभु श्रीरामाची कृपा आपल्यावर होईल ! – शंभू गवारे, पूर्व आणि पूर्वोत्तर राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

श्री. गवारे यांनी रामनवमी साजरी करण्यामागील शास्त्र, पूजा विधी, प्रभु श्रीराम यांच्या जीवनाशी संबंधित घटनांशी असलेला साधनेचा संबंध आणि त्याचे महत्त्व, मनुष्य जीवनाचा उद्देश, श्री कुलदेवता आणि श्री गुरुदेव दत्त यांचा नामजप करण्याचे महत्त्व आदी विषयांवर मार्गदर्शन केले.