१. दत्तात्रेय यांचे प्रगटीकरण : ‘सृष्टीनिर्मिती करणारा रजोगुणी ब्रह्मदेव, सृष्टीचे पालन करणारा सत्त्वगुणी विष्णु आणि सृष्टीचा विनाश करणारा तमोगुणी रुद्र, हे तिन्ही देव अतिथीरूपात अनसूयेचे सत्त्व पहाण्यासाठी भिक्षा मागण्याचे निमित्त करून आले; परंतु अनसूयेच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने तिन्ही देवांचे बाळ झाले. अत्री आणि अनसूयेने त्या देवांना ‘त्यांनी आपले पुत्र म्हणून रहावे’, असा वर मागितला. तेव्हा देव म्हणाले, ‘दत्त’ म्हणजे ‘दिला.’ अत्रींचा पुत्र म्हणून आत्रेय. अशा रीतीने ‘दत्तात्रेय’ असे नाव त्यांना मिळाले.
२. ज्यांच्या ठिकाणी त्रिगुणांचा प्रभाव नाही, ते अत्रि, द्वेष आणि मत्सर इत्यादी दुष्ट भावना जिच्यात नाहीत, ती अनसूया. दत्तात्रेय म्हणजे ज्ञान.
(साभार : श्री. वि.गो. देसाई, ‘गीता मंदिर पत्रिका’, डिसेंबर १९९८)