कोरोनावर मात केल्यानंतरही वर्षभरानंतरही रहातात लक्षणे ! – संशोधनातील निष्कर्ष

(प्रतिकात्मक छायाचित्र)

बीजिंग (चीन) – कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात भरती कराव्या लागलेल्या रुग्णांपैकी जवळपास ४९ टक्के रुग्णांना वर्षभरानंतरही कोरोनाची लक्षणे त्रास देतात, असा निष्कर्ष समोर आला आहे. ‘लॅन्सेट’ या वैद्यकीय संशोधन पत्रिकेमध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालामध्ये हा निष्कर्ष देण्यात आला आहे.

चीनच्या वुहान शहरातील १ सहस्र २७६ रुग्णांचा अभ्यास केल्यावर ३ पैकी एका रुग्णाला कोरोना होऊन गेल्यानंतर एका वर्षाने श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याचे, तसेच काही रुग्णांच्या फुप्फुसाला असलेला त्रास कायम असल्याचे समोर आले. कोरोनातून बचावलेल्या रुग्णांचे आरोग्य हे कोरोनाचा संसर्ग न झालेल्या इतर सामान्य रुग्णांच्या तुलनेत वाईट असल्याचे या अभ्यासाने अधोरेखित झाले.