साधकांनो, शरिराची हेळसांड करू नका !

‘मला आतापर्यंत काहीही झालेले नाही’, असे म्हणून चुकीच्या सवयी तशाच चालू ठेवत असाल, तर थांबा ! विचार करा ! ईश्वरप्राप्ती हे आपले ध्येय आहे. हा दूरचा प्रवास आहे. त्यामुळे त्यासाठी अत्यावश्यक असलेल्या शरिराची काळजी घ्या !’

साधना चांगली होण्यासाठी आयुर्वेदानुसार आचरण करण्याची आवश्यकता

ईश्वरप्राप्तीच्या वाटेवर मार्गक्रमण करणाऱ्या प्रत्येक साधकाने ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।’ म्हणजे ‘शरीर असेल, तरच धर्म किंवा साधना करणे शक्य होते’, हे सूत्र लक्षात ठेवायला हवे. साधनेसाठी शरीर निरोगी हवे. यासाठी आयुर्वेदानुसार आचरण करायला हवे.

सुंठ घालून उकळलेले पाणी आंबूस झाल्यास वापरू नका !

काही वेळा एका दिवसानंतर हे पाणी आंबूस होते. असे झाल्यास हे पाणी वापरू नये. शक्यतो आपल्याला आवश्यक तेवढेच पाणी उकळून त्या त्या दिवशी ताजे वापरावे.

सनातन उशीर (वाळा) चूर्णाचे औषधी उपयोग

येथे दिलेली माहिती आणि पत्रकातील माहिती यांमध्ये भेद असू शकतो. दोन्हींपैकी कोणत्याही प्रकारे औषधाचा वापर केला तरी चालतो.

तिखट खात नसूनसुद्धा काही जणांना पित्ताचा त्रास का होतो ?

बहुतेक वेळा यामागे बद्धकोष्ठता हे कारण असते. बद्धकोष्ठता दूर होण्यासाठी उपचार केल्यास हा त्रास लगेच न्यून होतो. पुढील प्राथमिक उपचार करून पहावेत. औषधे वैद्यांच्या समादेशाने (सल्ल्याने) घ्यावीत.

फोडणीच्या पोह्यांनी पित्त होते का ?

फोडणीचे पोहे बनवतांना अत्यंत अल्प प्रमाणात तेल वापरले, तर पित्ताचा त्रास होत नाही. अत्यल्प तेल वापरूनही उत्तम चवीचे फोडणीचे पोहे बनवता येतात. ज्यांना हे येत नाही, त्यांनी ओळखीच्या सुगरणींकडून ते शिकून घेतले, तर घरातील पित्ताचे त्रास पुष्कळ न्यून होतील.          

आजपासून नियमित न्यूनतम ३० मिनिटे व्यायाम करण्याचे ध्येय ठेवा !

‘व्यायाम नियमित केला, तरच त्याचे लाभ दिसून येतात. ‘व्यायाम केला; मात्र त्याचा काही लाभ झाला नाही’, असे होतच नाही. ‘कोणतीही गोष्ट अंगवळणी पडण्यासाठी ती न्यूनतम २१ दिवस प्रतिदिन केली पाहिजे’, असे मानसशास्त्र सांगते.

‘पुरेसा आहार घेऊनसुद्धा गळून गेल्यासारखे किंवा शक्तीहीन झाल्यासारखे वाटणे’ यावर आयुर्वेदातील प्राथमिक उपचार

पुरेसा आहार घेऊनसुद्धा काहींना असे होते. जठराग्नी (पचनशक्ती) मंद झाल्याचे हे लक्षण आहे. यावरील प्राथमिक उपचार इथे देत आहोत. हे प्राथमिक उपचार करून गुण न आल्यास वैद्यांचा समादेश (सल्ला) घ्यावा.

सनातन यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्णाचे औषधी उपयोग

येथे प्राथमिक उपचार दिले आहेत. ७ दिवसांत गुण न आल्यास वैद्यांचा समादेश (सल्ला) घ्यावा.

‘निवळ वाचनाला नव्हे, तर कृतीला महत्त्व आहे’, हे जाणून आयुर्वेद आचरणात आणा !

‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये नियमितपणे प्रसिद्ध होणार्‍या आयुर्वेदासंबंधीच्या चौकटींना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नियमित स्तंभातील चौकटींचे अर्धशतक आज पूर्ण होत आहे, त्या निमित्ताने . . .