लेखांक ५८
‘पावसाळ्यात, थंडीच्या दिवसांत, तसेच वसंत ऋतूमध्ये (थंडी आणि उन्हाळा यांच्या मधल्या काळामध्ये) सुंठीचे पाणी प्यायल्यास आरोग्य चांगले रहाते. सुंठीचे पाणी करण्यासाठी तांब्याभर पाण्यामागे पाव चमचा सुंठीचे चूर्ण या प्रमाणामध्ये पाणी उकळून गाळून घ्यावे. तहान लागल्यावर हे पाणी दिवसभर प्यावे; परंतु काही वेळा एका दिवसानंतर हे पाणी आंबूस होते. असे झाल्यास हे पाणी वापरू नये. शक्यतो आपल्याला आवश्यक तेवढेच पाणी उकळून त्या त्या दिवशी ताजे वापरावे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.९.२०२२)