सनातन उशीर (वाळा) चूर्णाचे औषधी उपयोग

सनातनची आयुर्वेदिक औषधे

१. उष्णतेचे विकार (उष्ण पदार्थ न सोसणे, तोंड येणे, अंगाची आग होणे, मूत्रमार्गाची जळजळ होणे, अंगावर पुरळ उठणे, चक्कर येणे, गळू (केसतोड) इत्यादी) : पाव चमचा वाळा चूर्ण दिवसातून ३ – ४ वेळा वाटीभर पाण्यात मिसळून प्यावे. (७ दिवस)

२. मळमळ, उलटी, अतीसार (जुलाब) होणे आणि शौचावाटे रक्त पडणे : वरीलप्रमाणेच घ्यावे. (७ दिवस)

३. उन्हाळ्यात किंवा ऑक्टोबरमध्ये वातावरणातील उष्णतेचा त्रास होऊ नये, यासाठी : पिण्याच्या १ लिटर पाण्यामागे अर्धा चमचा या प्रमाणात वाळ्याचे चूर्ण घालून ठेवावे. तहान लागेल, तेव्हा हेच पाणी प्यावे. (उन्हाळ्यात, तसेच ऑक्टोबर मासात)

वैद्य मेघराज पराडकर

१. प्रमाणासाठी चहाचा चमचा वापरावा.
२. येथे प्राथमिक उपचार दिले आहेत. ७ दिवसांत गुण न आल्यास वैद्यांचा समादेश (सल्ला) घ्यावा.
३. सनातन उशीर (वाळा) चूर्ण उपलब्ध आहे. याचे अन्य विकारांतील सविस्तर उपयोग त्याच्या डबीसोबतच्या पत्रकात दिले आहेत.
४. येथे दिलेली माहिती आणि पत्रकातील माहिती यांमध्ये भेद असू शकतो. दोन्हींपैकी कोणत्याही प्रकारे औषधाचा वापर केला तरी चालतो.

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.