सनातन यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्णाचे औषधी उपयोग

सनातनची आयुर्वेदिक औषधे

१. खोकला, घसा दुखणे, घसा खवखवणे, घसा बसणे, घशातून कफ बाहेर न पडणे आणि तोंड येणे : पाव चमचा ज्येष्ठमध चूर्ण दिवसातून ३ – ४ वेळा चघळून खावे. (५ दिवस)

२. बद्धकोष्ठता : दोन्ही जेवणांपूर्वी १ चमचा ज्येष्ठमध चूर्ण आणि १ चिमूट मीठ अर्धी वाटी कोमट पाण्यात मिसळून प्यावे. (१५ दिवस)

३. उष्णतेचे विकार (उष्ण पदार्थ न सोसणे, तोंड येणे, अंगाची आग होणे, मूत्रमार्गाची जळजळ होणे, अंगावर पुरळ उठणे, चक्कर येणे इत्यादी) : दिवसातून २ – ३ वेळा १ चमचा ज्येष्ठमध चूर्ण १ चमचा तुपातून घ्यावे. (१५ दिवस)

वैद्य मेघराज पराडकर
१. प्रमाणासाठी चहाचा चमचा वापरावा.
२. येथे प्राथमिक उपचार दिले आहेत. ७ दिवसांत गुण न आल्यास वैद्यांचा समादेश (सल्ला) घ्यावा.
३. सनातन यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्ण उपलब्ध आहे. याचे अन्य विकारांतील सविस्तर उपयोग त्याच्या डबीसोबतच्या पत्रकात दिले आहेत.
४. येथे दिलेली माहिती आणि पत्रकातील माहिती यांमध्ये भेद असू शकतो. दोन्हीपैकी कोणत्याही प्रकारे औषधाचा वापर केला तरी चालतो.– वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.  (२८.८.२०२२)