साधकांनो, शरिराची हेळसांड करू नका !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ५९

वैद्य मेघराज पराडकर

‘मनुष्यजन्म पुष्कळ पुण्याईने मिळतो. साधना करून ईश्वरप्राप्ती करण्यातच या मनुष्यजन्माचे सार्थक आहे. शरीर निरोगी असेल, तर साधना करणे सोपे जाते. ‘शरीर निरोगी ठेवण्यासाठी काय करावे ?’, हे प्रतिदिन ‘निरोगी जीवनासाठी आयुर्वेद’ या ‘सनातन प्रभात’मधील स्तंभातून (सदरातून) सांगितले जात आहे. असे असले, तरी साधकांमध्ये आरोग्याच्या संदर्भात गांभीर्य दिसून येत नाही. अवेळी झोपणे, अवेळी उठणे, अवेळी जेवणे या अत्यंत चुकीच्या सवयी आहेत. या सोडायलाच हव्यात. ‘मला आतापर्यंत काहीही झालेले नाही’, असे म्हणून चुकीच्या सवयी तशाच चालू ठेवत असाल, तर थांबा ! विचार करा ! दूरच्या प्रवासाला जातांना आपण ‘आपले वाहन सुस्थितीत आहे ना’, याची निश्चिती करत असतो; कारण ते सुस्थितीत नसेल, तर वाटेत अडथळा येऊ शकतो. ईश्वरप्राप्ती हे आपले ध्येय आहे. हा दूरचा प्रवास आहे. त्यामुळे त्यासाठी अत्यावश्यक असलेल्या शरिराची काळजी घ्या !’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.९.२०२२)