गोमूत्र आणि आयुर्वेदिक उपचार यांनी लंपीवर मात !

केंद्राच्या प्रधान वैद्य डॉ. नंदिनी भोजराज यांच्या मते स्वस्थ देशी गायीचे गोमूत्र उकळून थंड केल्यावर लंपीसदृश लक्षण असलेल्या प्राण्यांना प्यायला दिले, तर त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढून ते लंपीमुक्त होऊ शकतात.

कोणताही आवडीचा पदार्थ अवेळी न खाता जेवणाच्या वेळीच खा !

‘आयुर्वेदाला चटपटीत आणि चवदार पदार्थांचे वावडे आहे का ? मुळीच नाही. उलट रुची घेऊन जेवल्याने समाधान मिळते. त्यामुळे पदार्थांच्या चवींमध्ये विविधता हवीच; परंतु एखादा पदार्थ कितीही आवडणारा असला, तरी तो योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाण्याला पुष्कळ महत्त्व आहे !

रात्रीच्या जागरणाचा त्रास होऊ नये, यासाठी हे करा !

रात्रीचे जेवण लवकर झाल्याने जागरण झाल्यावर भूक लागते. अशा वेळी शेव, चिवडा यांसारखे फराळाचे पदार्थ खाऊ नका. जागरण होते तेव्हा पोटामध्ये पित्त वाढलेले असते. अशा वेळी फराळाचे तेलकट आणि तिखट पदार्थ खाल्ल्याने पित्ताचा भडका उडेल….

रात्रीच्या वेळी चिप्स, फरसाण इत्यादी खात असाल, तर सावधान !

नेहमी रात्रीच्या वेळी चिप्स, फरसाण, बाकरवडी, शेव, चिवडा यांसारखा फराळ चालू आहे’, असे असूनही जर तुम्ही निरोगी असाल, तर ती तुमची पूर्वपुण्याईच ! परंतु ही पूर्वपुण्याई संपली की, चुकीच्या सवयींचे परिणाम रोगाच्या रूपाने दिसू लागतील !

‘अलोपशिया एरियाटा’ अर्थात् चाई पडणे यावर उपचार !

‘अलोपशिया एरियाटा’ला आपण मराठीत ‘चाई पडणे’ असे म्हणतो. आयुर्वेदात याला ‘इंद्रलुप्त’ अशीही संज्ञा आढळते. शरिराची रोगप्रतिकारशक्ती न्यून असणे, हे या मागील प्रमुख कारण !

केवळ २ वेळाच आहार घेण्याची आरोग्यदायी सवय अंगी बाणवण्यासाठी हे करा !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : एकदा जेवतो तो योगी. दोन वेळा जेवतो तो भोगी. तीन आणि त्याहून जास्त वेळा जेवतो तो रोगी !

तूप हे अमृतासमान असल्याने ते घरी ठेवाच !

अनेकांना वाटते की, तूप महाग असते. आपल्याला परवडणार नाही; परंतु ‘तूप महाग असले, तरी शरिरासाठी अत्यावश्यक आहे’, हे लक्षात घ्यायला हवे. आरोग्याच्या दृष्टीने अनावश्यक पदार्थांवर होणारा (अप)व्यय वाचवून तो व्यय (खर्च) तुपावर करा.

येत्या १५ दिवसांत तब्येतीची विशेष काळजी घ्या !

नियमित आणि पुरेसे जेवण, झोप. आहारात बेसन, मैदा, हिरवी मिरची, विरुद्ध आहार, मांसाहार, मसालेदार पदार्थ शक्य तितके टाळावेत. आवश्यकता भासल्यास वेळ न दवडता लगेच आपल्या वैद्यांचा सल्ला घ्यावा.

शरीर निरोगी राखण्यासाठी केवळ एवढेच करा !

‘केवळ ‘प्रतिदिन नेमाने व्यायाम करणे’ आणि ‘दिवसातून २ वेळाच आहार घेणे’, या दोनच गोष्टी नित्य आचरणात ठेवल्या, तर शरीर निरोगी रहाते. दुसरे काहीही करण्याची आवश्यकता रहात नाही, एवढे या २ कृतींना महत्त्व आहे !’

प्रतिदिन सायंकाळी चहा-फराळ करणे आवश्यक नसल्याने ते सोडा !

‘अनेक जण सायंकाळच्या वेळेत चहा आणि फराळ करतात. फराळामध्ये शेव, चिवडा, फरसाण यांसारखे तळलेले पदार्थ खातात. खरेतर या सायंकाळच्या चहा-फराळाची शरिराला थोडीसुद्धा आवश्यकता नसते, तरीही बहुतेक जण केवळ घरी हे पदार्थ आणून ठेवलेले किंवा उपलब्ध आहेत म्हणून खातात.