‘पचन चांगले असणे’, हे केवळ शरिराच्याच नव्हे, तर मनाच्या आरोग्यासाठीही आवश्यक !

‘माझ्या एका वैद्यमित्राने  सांगितलेला एक प्रसंग त्याच्याच शब्दांत येथे देत आहे – वैद्य मेघराज माधव पराडकर

गुडघ्यांना मागच्या बाजूनेही तेल लावा !

सर्वसाधारणपणे गुडघेदुखीवर उपचार म्हणून गुडघ्यांना तेल लावा म्हटले की, बहुतेक जण केवळ गुडघ्याच्या पुढील बाजूला, म्हणजे गुडघ्याच्या वाटीलाच तेल लावतात.

व्रणावर (जखमेवर) आयुर्वेदातील प्राथमिक उपचार

‘कोणत्याही कारणाने (उदा. खरचटणे, कापणे यांमुळे) व्रण (जखम) झाला, तर त्यावर तुळशीचा रस लावावा. तुळशीचा रस लावल्याने व्रणामध्ये जंतूसंसर्ग होण्याची शक्यता न्यून होते आणि व्रण लवकर भरून येतो.

पावसाळ्यानंतर चालू होणार्‍या शरद ऋतूमध्ये उपयुक्त सनातनची आयुर्वेदीय औषधे

या ऋतूमध्ये होणार्‍या नेहमीच्या विकारांवर उपयुक्त सनातनची आयुर्वेदीय औषधे इथे देत आहोत – वैद्य मेघराज माधव पराडकर

जेवण जास्त झाल्याने होणार्‍या अपचनावर आयुर्वेदातील प्राथमिक उपचार

काही वेळा (उदा. सणासुदीच्या दिवशी) जास्त जेवल्याने पोट जड होऊन अपचनाची शंका येऊ लागते. अशा वेळी ‘लशुनादी वटी’ या औषधाच्या १ – २ गोळ्या चघळून खाव्यात.

केवळ ‘आयुर्वेदातील औषधे खाणे’ म्हणजे आयुर्वेदानुसार आचरण नव्हे !

स्वतःच्या मनाने पुष्कळ काळ एखादे औषध घेत रहाणे चुकीचे आहे. निरोगी रहाण्यासाठी आयुर्वेदातील औषधे नियमित खाणे नव्हे, तर केवळ पाचच मूलभूत पथ्ये पाळणे आवश्यक असते.

चाळिशीनंतर गुडघे दुखू नयेत, यासाठी गुडघ्यांना नियमित तेल लावा !

कोणतेही खाद्य तेल किंवा औषधी तेल वापरल्यास चालते. रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर अंघोळीपूर्वी तेल लावावे. गुडघ्यांना लावलेले तेल न्यूनतम ३० मिनिटे रहायला हवे. नंतर धुतल्यास चालते – वैद्य मेघराज माधव पराडकर

मूत्रमार्गाच्या जळजळीवर आयुर्वेदातील प्राथमिक उपचार

‘चहाचा पाव चमचा सनातन उशीर (वाळा) चूर्ण दिवसातून ४ वेळा अर्धी वाटी पाण्यात मिसळून प्यावे. ७ दिवसांत गुण न आल्यास वैद्यांचा समादेश (सल्ला) घ्यावा.’ – वैद्य मेघराज माधव पराडकर

उचकीवर आयुर्वेदातील प्राथमिक उपचार

या औषधाच्या २ ते ४ गोळ्यांची बारीक पूड करून ती २ चमचे तुपात नीट मिसळून चाटून खावी. तूप उपलब्ध न झाल्यास गोळ्या चावून खाव्यात – वैद्य मेघराज माधव पराडकर