गोमूत्र आणि आयुर्वेदिक उपचार यांनी लंपीवर मात !

नागपूर येथील गोविज्ञान अनुसंधान केंद्राचा दावा

गोमूत्र आणि आयुर्वेदिक उपचार यांनी लंपीवर मात

नागपूर – लंपी आजाराने राज्यातील ३० जिल्ह्यांत थैमान घातले आहे. त्यावर मात करण्यासाठी देशभरात प्रयत्न केले जात आहेत. लसीकरणासह अलगीकरणही करण्यात येत आहे. जनावरांमध्ये पसरलेल्या लंपी या त्वचारोगावर गोमूत्र आणि इतर आयुर्वेदिक उपचार परिणामकारक ठरत आहेत. जिल्ह्यातील देवलापार येथील गोविज्ञान अनुसंधान केंद्रातील वैद्यांचा दावा आहे की, गोमूत्रावर आधारलेल्या पद्धतीने त्यांच्या गोशाळेतील अनुमाने ८५० गोवंशीय प्राणी लंपीमुक्त आहेत. केंद्राच्या प्रधान वैद्य डॉ. नंदिनी भोजराज यांच्या मते स्वस्थ देशी गायीचे गोमूत्र उकळून थंड केल्यावर लंपीसदृश लक्षण असलेल्या प्राण्यांना प्यायला दिले, तर त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढून ते लंपीमुक्त होऊ शकतात. ज्या प्राण्यांना लंपीचा संसर्ग अद्याप झालेला नाही, त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढून ते लंपीरोगाशी लढा देऊ शकतात.