सकाळी उठल्याउठल्या भरपूर पाणी पिऊ नये !

चूल पेट घेत असतांना तिच्यात तांब्याभर पाणी ओतले, तर काय स्थिती होईल ? सकाळी उठल्याउठल्या भरपूर पाणी प्यायल्याने जठराग्नीच्या (पचनशक्तीच्या) संदर्भात असेच होत असते. त्यामुळे सकाळी तहान लागेल तेव्हा थोडे थोडे पाणी प्यावे.’

परकीय आक्रमणांमुळे आयुर्वेदाचा प्रसार थांबला ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

आता आयुर्वेदाला पुन्हा मान्यता मिळत आहे. आयुर्वेदाचा प्रसार करण्याची वेळ आली आहे. आयुर्वेदाला जागतिक मान्यता मिळण्यासाठी पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

पूर्व किंवा दक्षिण या दिशांना डोके करून झोपावे ! (चार दिशांना डोके करून झोपल्यास होणारे परिणाम)

‘पूर्वेकडे डोके करून झोपल्यास धन, तर दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास आयुष्य प्राप्त होते. पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास चिंता वाढते, तर उत्तरेकडे डोके करून झोपल्यास हानी किंवा मृत्यू ओढवतो.

ग्रहणकाळात जेवणे चुकीचे

काही वर्षांनी विदेशात ‘ग्रहणकाळात भोजन केल्याने शरिरावर होणारे अनिष्ट परिणाम’ यासंबंधी ‘शोध’ प्रसिद्ध होतील. विज्ञानवादी (?) तेव्हा ग्रहणकाळात उपवास करतील.

ग्रहणकाळात उपवास करण्याने होणारा आध्यात्मिक स्तरावरील लाभ

उपवास केल्यास सुस्ती येत नाही, म्हणजे तमोगुण वाढत नाही. उलट सत्त्वगुण वाढतो. ग्रहणकाळात उपवास केल्याने जो सत्त्वगुण वाढतो, त्याच्यामुळे ग्रहणकाळातील साधना चांगली होते.

इतरांची झोपमोड होणार नाही, याची काळजी घ्या !

‘एखादा माणूस झोपलेला असेल, तर त्याची झोपमोड होऊ देऊ नये.’ अनेकांना याचे भान नसते. दुसरा झोपलेला असतांना मोठ्याने बोलणे, पिशवीचा किंवा अन्य आवाज करणे, तसेच झोपलेल्याला जाग येईल, अशी कोणतीही कृती करणे टाळावे.’

सूर्याेदयापूर्वी उठावे !

सूर्येणाभ्युदितो यश्च त्यक्तः सूर्येण वा स्वपन् ।
अन्यत्रातुरभावात्तु प्रायश्चित्ती भवेन्नरः ।।
अर्थ : जो मनुष्य सूर्याेदय किंवा सूर्यास्त या वेळी झोपून रहातो, त्याने प्रायश्चित्त घ्यायला हवे. रुग्णाईत मनुष्य याला अपवाद आहे.’

ज्याला चूल पेटवता येते, त्याला निरोगी रहाण्याचे मर्म समजते !

भूक वाढू लागल्यावर टप्प्याटप्प्याने आहाराचे प्रमाण वाढवल्यास किंवा जड पदार्थांचा आहारात समावेश केल्यास दुपारचे आणि रात्रीचे जेवण यांच्या मध्ये काही खाण्याची आवश्यकता रहात नाही. यामुळे स्वतःच्या पचनशक्तीचे अनुमान घेऊन आहाराचे प्रमाण आणि पदार्थ ठरवणे आवश्यक आहे.

शरीरस्वास्थ्यासाठी व्यायाम आवश्यक आहे !

शरीरस्वास्थ्यासाठी नियमित आणि वेळेवर व्यायाम करावा. त्याच्या समवेत आहार नियंत्रित (डाएटिंग) करणे, म्हणजे उपाशी रहाणे नव्हे, तर संतुलित आहार घेणे आणि तोही वेळेवर घेणे आवश्यक असते.

‘अन्न ग्रहण करणे’ ही साक्षात् अग्निनारायणाची उपासना आहे’, असा भाव ठेवा !

निरोगी जीवनासाठी जठरातील (पोटातील) अग्निनारायणाची कृपा असावी लागते. ती होण्यासाठी ‘अन्न ग्रहण करणे’ ही साक्षात् अग्निनारायणाची उपासना आहे’, असा भाव ठेवा.