निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ८५
‘न शयानं प्रबोधयेत् ।’ (याज्ञवल्क्यस्मृति, अध्याय १, श्लोक १३८)
म्हणजे ‘एखादा माणूस झोपलेला असेल, तर त्याची झोपमोड होऊ देऊ नये.’ अनेकांना याचे भान नसते. दुसरा झोपलेला असतांना मोठ्याने बोलणे, पिशवीचा किंवा अन्य आवाज करणे, तसेच झोपलेल्याला जाग येईल, अशी कोणतीही कृती करणे टाळावे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१०.२०२२)