पूर्व किंवा दक्षिण या दिशांना डोके करून झोपावे ! (चार दिशांना डोके करून झोपल्यास होणारे परिणाम)

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ८९

संग्रहित चित्र
वैद्य मेघराज पराडकर

प्राक्शिरः शयने विद्यात् धनम् आयुश्च दक्षिणे ।
पश्चिमे प्रबला चिन्ता हानिमृत्युरथोत्तरे ।।

– आचारमयूख

अर्थ : ‘पूर्वेकडे डोके करून झोपल्यास धन, तर दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास आयुष्य प्राप्त होते. पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास चिंता वाढते, तर उत्तरेकडे डोके करून झोपल्यास हानी किंवा मृत्यू ओढवतो.

तात्पर्य पश्चिम किंवा उत्तर या दिशांना डोके करून झोपू नये.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.११.२०२२)