‘अन्न ग्रहण करणे’ ही साक्षात् अग्निनारायणाची उपासना आहे’, असा भाव ठेवा !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ८२

वैद्य मेघराज पराडकर

‘केवळ पोट भरण्यासाठी जेवायचे नाही. ‘अन्न ग्रहण करणे’, हा यज्ञच आहे. निरोगी जीवनासाठी जठरातील (पोटातील) अग्निनारायणाची कृपा असावी लागते. ती होण्यासाठी ‘अन्न ग्रहण करणे’ ही साक्षात् अग्निनारायणाची उपासना आहे’, असा भाव ठेवा.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१०.२०२२)