निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ८४
‘सूर्याेदय झाला, तरी झोपून रहाणे’, हे आरोग्याच्या, तसेच धर्मशास्त्राच्या दृष्टीनेही चुकीचे आहे. यासाठी धर्मशास्त्रात प्रायश्चित्त घ्यायला सांगितले आहे.
सूर्येणाभ्युदितो यश्च त्यक्तः सूर्येण वा स्वपन् ।
अन्यत्रातुरभावात्तु प्रायश्चित्ती भवेन्नरः ।। – विष्णुपुराण, अंश ३, अध्याय ११, श्लोक १०२
अर्थ : जो मनुष्य सूर्याेदय किंवा सूर्यास्त या वेळी झोपून रहातो, त्याने प्रायश्चित्त घ्यायला हवे. रुग्णाईत मनुष्य याला अपवाद आहे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१०.२०२२)