पाव, बिस्कीट, टोस्ट आणि खारी, अनेकांचे खिसे भरी !

‘अनेकांना खारी, टोस्ट, बिस्कीट आणि पाव इत्यादी बेकरीमधील पदार्थ चहामध्ये बुडवून खाण्याची सवय असते. मुळात हे आपल्या भारतियांचे खाद्यच नाही ! ज्या ठिकाणी ताजे अन्न खायला मिळण्याची सोय नाही, अन्न शिजवण्यासाठी अग्नी आणि पाणी इत्यादी साधने नाहीत किंवा प्रवासामध्ये नेण्यासाठी…

मूतखड्यावर उपयुक्त सनातन पुनर्नवा चूर्ण

या उपचाराने मूतखडा फुटून लघवीवाटे बाहेर पडण्यास साहाय्य होते. हा उपचार १ मास करावा. यापेक्षा अधिक दिवस औषध घ्यायचे असल्यास वैद्यांचा समादेश घ्यावा.

वटवृक्षाचे आयुर्वेदाच्‍या दृष्‍टीने महत्त्व

वटवृक्ष हा केवळ महावृक्ष नव्‍हे, तर महौषध आहे. त्‍याची मुळे, खोडाची साल, चिक, अंकुर, पाने, फुले, फळे, पारंब्‍या इत्‍यादी कल्‍पतरूप्रमाणे नानाविध प्रकारे औषधांमध्‍ये उपयुक्‍त ठरते; पण निश्‍चितच योग्‍य पद्धतीने आणि वैद्यांच्‍या समादेशाने (सल्‍ल्‍याने) याचा उपयोग करावा.

कर्णपूरण (कानांत तेल घालणे)

‘पूर्वीच्‍या काळी आपल्‍या घरातील ज्‍येष्‍ठ व्‍यक्‍ती लहान मुलांच्‍या कानांमध्‍ये तेल घालायचे. मुलांनाही ते आवडायचे आणि गंमत वाटायची; पण नंतर वेगवेगळ्‍या माध्‍यमांतून ‘कर्णपूरण’ म्‍हणजे कानांत तेल घालण्‍याविषयी काही मतमतांतरे प्रचलित झाली अन् ते बंद झाले.

दूध किंवा न्‍याहारी अंघोळीपूर्वी न घेता अंघोळ झाल्‍यावरच का घ्‍यावेत ?

अंघोळ हे भूक, ऊर्जा आणि बळ यांमध्‍ये वृद्धी करते. अंघोळ केल्‍याने अग्‍नी वाढून कडकडून भूक लागते, तेव्‍हा न्‍याहारी करावी. त्‍यामुळे सर्वांनी लवकर उठून अंघोळ करावी आणि त्‍यानंतरच न्‍याहारी करावी. आयुर्वेदोक्‍त दिनचर्येचे पालन करावे !

सर्दी, खोकला किंवा ताप आल्‍यास उपवास करावा !

या दिवसांत होणारे सर्दी, खोकला किंवा ताप हे विकार कफ वाढल्‍याने होतात. हे विकार झाल्‍यास ते लवकर बरे होण्‍यासाठी सकाळी अल्‍पाहार करणे टाळावे.

गायीच्‍या धारोष्‍ण दुधाचे आयुर्वेदाच्‍या दृष्‍टीने महत्त्व

गायीचे दूध काढल्‍यावर ते मुळात थोडे गरम असते. त्‍यामुळे त्‍याला ‘धारोष्‍ण’ म्‍हणतात.

वसंत ऋतूमध्‍ये आरोग्‍यरक्षणासाठी हे करा !

‘हिवाळा संपला की, सूर्याच्‍या उष्‍णतेने शरिरातील कफ पातळ होऊ लागतो. त्‍यामुळे अग्‍नी (पचनशक्‍ती) मंद होतो. सध्‍याचा काळ हा असा आहे.

भेसळविरहित, तसेच गुणवत्तापूर्ण सनातनची औषधी चूर्णे वापरा

सनातनची आयुर्वेदाची औषधे बनवतांना उत्तम गुणवत्ता राखण्‍यासाठी प्रयत्न केले आहेत. यामुळेच ‘सनातनच्‍या औषधी चूर्णांचा चांगला गुण येतो’, असा अनेकांचा अनुभव आहे.

आतापासून पावसाळा चालू होईपर्यंत नियमित दही खाणे टाळावे !

‘वसंत, ग्रीष्म आणि शरद हे ३ ऋतू, म्हणजे वर्षातून ६ मास (साधारण फेब्रुवारी ते मे आणि सप्टेंबर अन् ऑक्टोबर) दही खाऊ नये’, असे आयुर्वेद सांगतो. पावसाळा आणि थंडी या दिवसांतच दही खाता येते. आता थंडी संपून वसंत ऋतू चालू झाला आहे.